शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
2
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
3
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
4
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
5
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
6
गौतम अदानींना ज्यांनी तारलं, त्यांनाच अमेरिकेत बसला लाखो डॉलर्सचा दंड; कारण काय?
7
IND vs BAN : जा रे जारे पावसा! दुसऱ्या दिवसाचा बहुतांश खेळ पाहण्यात नव्हे पाण्यात जाणार?
8
त्रिग्रही बुधादित्य राजयोग: ७ राशींना अनुकूल, सरकारी कामात लाभ; उत्पन्नात वाढ, मनासारखा काळ!
9
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
10
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
11
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
12
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर
13
आज शेअर बाजार खुला राहणार, NSE वर होणार विशेष ट्रेडिंग सेशन; कारण काय?
14
Zomatoच्या सह-संस्थापक आकृती चोप्रा यांचा राजीनामा; १३ वर्षाचा प्रवास थांबला, पाहा त्यांची Networth किती?
15
Bigg Boss Marathi Season 5: राखी सावंतची घरात एन्ट्री! 'ड्रामा क्वीन'ला पाहून निक्कीची झाली अशी अवस्था; प्रोमो व्हायरल
16
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
17
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
18
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
19
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
20
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा

विघ्नहर्त्याच्या आगमनाला ‘खड्ड्यांचे विघ्न’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 10:45 PM

बाप्पाची चाहुल लागताच मूर्तीकार मूर्ती घडविण्यात व्यस्त झाले असून गणेशभक्त मोठ्या उत्साहात बाप्पाच्या आगमनाच्या तयारीला लागले आहेत. मात्र चंद्रपुरातील प्रमुख रस्त्यासह शहरातील अंतर्गत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे. हे खड्डे यंदा विघ्नहर्त्याच्या आगमनात विघ्न आणणार काही काय, अशी चिंता गणेशभक्तांना सतावत आहे.

ठळक मुद्देप्रमुख रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांचीही दुरवस्था : गणेशभक्तांमध्ये चिंतेचे वातावरण

परिमल डोहणे।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : बाप्पाची चाहुल लागताच मूर्तीकार मूर्ती घडविण्यात व्यस्त झाले असून गणेशभक्त मोठ्या उत्साहात बाप्पाच्या आगमनाच्या तयारीला लागले आहेत. मात्र चंद्रपुरातील प्रमुख रस्त्यासह शहरातील अंतर्गत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे. हे खड्डे यंदा विघ्नहर्त्याच्या आगमनात विघ्न आणणार काही काय, अशी चिंता गणेशभक्तांना सतावत आहे.जिल्ह्यात १५०० सार्वजनिक गणेश मंडळाद्वारे तर ११ हजार ८५० घरगुती गणेशमूर्तीची स्थापना मागीलवर्षी करण्यात आली होती. त्यामध्ये चंद्रपूर शहरामध्ये २९६ गणेशमंडळांद्वारे तर तीन हजार १५ घरगुती गणेशाची स्थापना करण्यात आली होती. जिल्ह्यात गणपतीची वाजत-गाजत स्थापना व विसर्जन करण्याची जिल्ह्याची परंपरा आहे. जिल्ह्यातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असल्याने गणेशमूर्ती स्थापना करण्यासाठी नेताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. पावसापूर्वी रस्त्याची दुरुस्ती करणे गरजेचे असतानासुद्धा बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे गणेशभक्तांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. चंद्रपुरातील कस्तुरबा मार्ग, महात्मा गांधी मार्ग, तुकूम मार्ग, चंद्रपूर-नागपूर मार्ग, रामनगर, बाबुपेठ मार्ग, गांधी चौक ते बागला चौक मार्ग, गांधी चौक ते पठाणपुरा मार्ग, रहमत नगर मार्ग या प्रमुख मार्गासह दवाबाजार ते पाण्याची टाकी, अंचलेश्वर गेट ते लालपेठ, सवारी बंगला ते चोर खिडकी, वाहतूक कार्यालय याठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. या मार्गावरुनच गणेशभक्तांना गणपतीची मूर्ती न्यावी लागते. मागील काही वर्षांपासून शासनाने प्लॉस्टर आॅफ पॅरिसच्या गणेश मुर्तीची स्थापना करण्यास बंदी घातली आहे. भक्तांना मातीच्या गणपतीची स्थापना करावी लागते. मूर्तीकार तणस व मातीच्या साह्याने मूर्तीला आकार देत आहेत. गणेशाची मूर्ती स्थापनेसाठी नेताना रस्त्यावरील खड्ड्यांना सामोरे जाण्याची पाळी आहे. गणेशभक्तांची ही समस्या लक्षात घेऊन बांधकाम विभाग व मनपाने दुरूस्ती करण्याची मागणी केली आहे.अरुंद रस्त्यामुळे त्रासशहरातील प्रमुख रस्त्यांसह सर्व अंतर्गत रस्ते अरुंद आहेत. त्यातही व्यावसायिकांनी रस्त्यावर अतिक्रमण केल्याने हे रस्ते पुन्हा अरुंद झाले आहेत. त्यातही वाहनचालक रस्त्यावर दुचाकी व चारचाकी वाहन ठेवतात. यातून वाहतूकीची कोंडी होत असते. यातच शहरात मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. यामुळे भक्तांना गणपती मूर्तीची स्थापना करण्यासाठी घरी नेताना अडचणींचा सामना करावा लागतो.१५ दिवसांतच उखडले रस्तेचंद्रपुरात मागील महिन्यात रस्त्यावरील खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे संबंधित विभागाने रस्त्यांची डागडूजी सुरु केली. मात्र डागडूजी करताना केवळ माती मिश्रित साहित्यांचा वापर करण्यात येत आहे. दरम्यान जिल्ह्याभरात पाच दिवस संततधार पाऊस पडल्याने डागडूजी केलेले रस्ते पूर्णपणे उखडले आहेत.जटपुरा गेट ठरतो अडसरशहरातील ऐतिहासिक जटपूरा गेटमुळे शहरात मोठी वाहतूक कोंडी होत असते. अनेक राजकीय पक्ष व सामाजिक संघटनेतर्फे याबाबत आंदोलनही केले. मात्र अद्यापही कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही. सदर गेट हा अरुंद तसाच कमी उंचीचा असल्याने याठिकाणातून गणपतीची मूर्ती जाण्यास अडचण निर्माण होते. अनेकदा गणपती नेताना गणेशभक्तांना तारेवरची कसरत करावी लागते.