निर्माल्य कलशही आणले : यंदा प्रथमच उपक्रमचंद्रपूर : पर्यावरणसंवर्धनाचा नारा देश यंदा चंद्रपूरच्या महानगर पालिकेने शहरात पाच ठिकाणीे विसर्जनकुंड उभारले आहेत. या सोबतच निर्माल्य गोळा करण्यासाठी निर्माल्य कलशही ठराविक चौकात ठेवले आहेत.चंद्रपुरातील बिघडलेले पर्यावरण, उद्योगांमुळे दूषित होणारे नदी आणि तलावांचे पाणी यावर चिंता व्यक्त करीत चंद्रपुरातील पर्यावरणवादी संघटनांनी मागील वर्षीच यावर उपायोजना करण्याची मागणी केली होती. त्याची दखल घेत मागील वर्षी इरई नदीपात्रलगत कृत्रित तलावासारखा मोठा खड्डा करून विसर्जनाची तात्पुरती व्यवस्था मनपाने केली होती. या सोबतन त्या ठिकाणी निर्माल्य कुंडही ठेवले होते. नागरिकांनी या उपक्रमाला चांगला प्रतिसादही दिला होता. एकट्या चंद्रपूर शहरात साधारणपणे २० हजार कुटूंबांकडे घरगुती गणेशमूर्तींची स्थापना केली जाते, या सोबतच ५०० वर सार्वजनिक मंडळातही गणेशमूर्तींची स्थापना होते. असा निष्कर्ष आहे. चंद्रपुरात सार्वजनिक गणेश मंडळातील मोठ्या मूर्र्तींचे विसर्जन रामाळा तलावात तर, लहान मूर्र्तींचे विसर्जन इरई नदीत केले जाते. यामुळे तलावात आणि नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर जलप्रदुषण होते, गाळ साचला जातो, हा दरवर्षीचा अनुभव आहे. हे लक्षात घेवून यंदा महानगर पालिकेने पुढाकार घेवून शहरात फायबर प्लॉस्टीकने तयार केलेले विसर्जन कुंड आणले असून ते शहरात पाच ठिकाणी ठेवले आहेत. एका कुंडात सात ते आठ हजार पाणी राहणार असून किमान दोन हजार घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याची क्षमता या कुंडात आहे. मूर्र्तींचे विसर्जन तलावाच्या पाण्यात झाल्यावर मूर्तीवरील रासायनिक रंग पाण्यात मिसळतात. यामुळे जलप्रदुषण वाढते. प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती असल्यास त्या विरघळत नसल्याने पाण्यावर तरंगतात. त्यामुळे मूर्तींचे पावित्र्य नष्ट होते. हे टाळण्याचे आवाहन पर्यावरणप्रेमींनी केले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
पर्यावरण संवर्धनासाठी मनपाने उभारले विसर्जनकुंड
By admin | Published: September 20, 2015 1:36 AM