आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : शेतात औषधी फवारणी करताना जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. त्या कुटुंबाला आधार देण्यासाठी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्यातर्फे योगगुरू बाबा रामदेव यांच्या उपस्थितीत मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबास दुधाळू गार्इंचे वितरण करण्यात आले. वरोरा येथे पार पडलेल्या शेतकरी मेळाव्यात हा कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी साखरी येथील शेतमजूर बालाजी कोवे यांच्या कुटुंबाबातील शशिकला बालाजी कोवे, कोरपना तालुक्यातील चनई बु. येथील मृतक शेतकरी रामशाव कुमरे यांच्या कुटुंबातील लीलाबाई कुमरे यांना गीर जातीच्या दुधाळू गायींचे वाटप व प्रमाणपत्र योगऋषी बाबा रामदेव यांच्या हस्ते व ना. हंसराज अहीर यांच्या उपस्थितीत देण्यात आले. तर पोंभुर्णा तालुक्यातील चेक ठाणेवासना येथील साईनाथ रघूनाथ सोयाम यांच्या कुटुंबातील जीवनकला साईनाथ सोयाम व राजूरा तालुक्यातील बाबापूर येथील सुरज पारखी यांच्या कुटुंबातील गोविंदा हरी पारखी व निर्मला पारखी यांना प्रमाणपत्र देण्यात आले असून त्यांना लवकरच घरपोच गायी पोहचविण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.गोमातेने आर्थिक संपन्नता येणार -रामदेवबाबागोमातेच्या माध्यमातून सर्व लाभार्थी कुटुंबियांच्या जीवनात नवचैतन्य व आर्थिक संपन्नता निर्माण होणार आहे, असा आशिर्वाद योगगुरु रामदेव बाबा यांनी आत्महत्याग्रस्त कुटुंबाच्या परिवारास दिला.
मृत शेतकऱ्यांच्या परिवारास दुधाळू गार्इंचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 11:42 PM
शेतात औषधी फवारणी करताना जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला.
ठळक मुद्देहंसराज अहीर : अनेकांना मिळाला दिलासा