सरस्वती विद्यालयात दुर्गम भागातील अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ये-जा करताना त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. शेवटी समाजऋण व विद्यार्थीऋण समोर ठेवून जनकल्याण बहुउद्देशीय शिक्षण संस्था नवरगाव तर्फे ४० गरजू विद्यार्थ्यांना सायकलचे वितरण करण्यात आले. याशिवाय इयत्ता ६ ते १० मधील विद्यार्थिनी तथा मातांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती करुन सॅनिटरी पॅडचे वितरण शनिवारी करण्यात आले. या कार्यक्रमाला बहुसंख्य विद्यार्थी व माता उपस्थित होत्या. यावेळी डाॅ. नुपूर गोंदे व डाॅ. पायल गोंदे यांनी मार्गदर्शन केले.यावेळी श्याम बोकाडे, सुलोचना बोकाडे, संस्थाध्यक्ष विजय बारापात्रे, संस्था सचिव मनिषा किशोर बारापात्रे, उपाध्यक्ष संजय सोनकुसरे, सदस्य रमेश मस्के, गीता बारापात्रे, संकेत बारापात्रे, उत्कर्ष बारापात्रे, मुख्याध्यापक दीपक बोकडे उपस्थित होते.
गरजू विद्यार्थ्यांना सायकलचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 4:20 AM