लोकमत न्यूज नेटवर्कदेवाडा : राजुरा तालुक्यातील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था देवाडा येथील ३८४ शेतकरी सभासदांना संस्थेच्या वतीने हंगाम खरीप हंगामाकरिता पीक कर्जाचे ३ कोटी ८२ लाखांचे धनादेश जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.संस्थेचे अध्यक्ष भीमराव कन्नाके, उपाध्यक्ष अब्दुल हमीद गणी पटेल, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा राजुºयाचे उपविभागीय अधिकारी योगेश कुंभेजकर, तहसीलदार डॉ. रविंद्र होळी, संचालक नारायण गड्डमवार, शंकर बोकुर, ऋषी गेडाम, गिरजा मेश्राम आदी उपस्थित होते. कार्यक्रमाला संस्थेचे व्यवस्थापक जे.पी.दुर्गे, बँकेचे एन. एम, सय्यद, घोंगडे तसेच विभागीय अधिकारी प्रमोद राऊत यांनी सहकार्य केले. जिल्हाधिकारी डॉ. खेमणार यांनी सोंडो ग्रामपंचायतीला भेट दिली. राजुरा तालुक्यातील शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या शेतकरी सन्मान योजनेचा त्यांनी आढावा घेतला. शेतकऱ्यांशी संवाद साधून अडचणी जाणून घेतल्या. शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकºयांना देण्याच्या सूचना संंबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. सहकारी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशीही चर्चा केली.यावेळी सरपंच पार्वता आत्राम, उपसरपंच नारायण गड्डमवार व ग्रा. पं. सदस्य तसेच तहसीलदार डॉ. होळी, बीडीओ रमावत, विस्तार अधिकारी पारखी, कुळसंगे, महाजनवार ग्रामसेवक सुनील कुमरे उपस्थित होते.
पीक कर्जाचे धनादेश जिल्हाधिकाऱ्यांकडून वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2019 10:11 PM