भद्रावती: स्थानिक विवेकानंद महाविद्यालयातील तीन विद्यार्थ्यांना गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीतर्फे शायनिंग कलर कोटचे वितरण करण्यात आले. या विद्यार्थ्यांनी सन २०१४-१५ मध्ये आंतरविद्यापीठ स्पर्धेत गोंडवाना विद्यापिठाचे प्रतिनिधीत्व केले.आंतरविद्यापीठ कबड्डी स्पर्धेत या महाविद्यालयातील बी.ए. भाग १ चा सागर नन्नावरे याने वेस्ट झोन आंतरविद्यापीठ स्पर्धा संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथे गोंडवाना विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले. तसेच आंतर विद्यापीठ सर्कल कबड्डी स्पर्धेत या महाविद्यालयातील बी.ए. भाग- २ चा धीरजकुमार पाशी व बी.ए. भाग- १ चा अविनाश लोणारे यांनी अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेत पंजाबी विद्यापीठ पटियाला (पंजाब) येथे गोंडवाना विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले.कलरकोट प्राप्त विद्यार्थ्यांचा विवेकानंद महाविद्यालयात सत्कार करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष अॅड. मोरेश्वर टेमुर्डे, उपाध्यक्ष पु. वा. स्वान, कोषाध्यक्ष झेड. लांबट, सचिव अॅड. बबनराव बोथले तसेच प्राचार्य डॉ, एन. जी.उमाटे, शारिरीक शिक्षण विभाग प्रमुख प्रा. संगीता बांबोडे व सर्व प्राध्यापकवृंदातर्फे यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले जात आहे. (तालुका प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांना कलर कोटचे वितरण
By admin | Published: May 25, 2015 1:41 AM