नागभीड तालुक्यातील मौशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जि.प. सदस्य व रुग्ण कल्याण समितीचे अध्यक्ष संजय गजपुरे यांच्या हस्ते रुग्णांना हत्तीरोग किटचे वाटप करण्यात आले. मौशी केंद्रांतर्गत सध्या ३३८ हत्तीरोग रुग्णांची नोंद असून, या सर्वांना किटचा लाभ मिळणार आहे. सुरुवातीला या किटचा वापर कसा करावा, याचे प्रात्यक्षिक आरोग्य कर्मचाऱ्यांनी उपस्थितांसमोर करून दाखविले.
हत्तीरोग निर्मूलनासाठी अजूनही अधिक कार्य करण्याची गरज असल्याचे मत संजय गजपुरे यांनी व्यक्त करीत, प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरासभोवतील परिसर स्वच्छ ठेवण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. विशेषतः पाय विद्रुप करणाऱ्या या रोगाचे उच्चाटन प्रतिबंधात्मक औषधी गोळ्यांमुळे शक्य असल्याचीही माहिती त्यांनी यावेळी दिली. यावेळी सरपंच संगीता करकाडे, माजी सरपंच वामन तलमले, ग्रा.पं. सदस्य अरविंद भुते, विकास मानापुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
250821\175-img-20210825-wa0025.jpg
कीटचा वापर कसा करावा याचे प्रात्यक्षिक करून दाखवतांना