आमदार बंटीभाऊ भांगडिया यांचा सेवा उपक्रम
शंकरपूर येथे वाटप
शंकरपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार बंटी भांगडिया यांच्या माध्यमातून शंकरपूर येथे अनिल शेंडे यांच्या निवासस्थानी सलून व बँड वाजंत्री व्यवसाय करणाऱ्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप भाजप जिल्हा सचिव राजू पाटील, देवतळे यांच्या हस्ते करण्यात आले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील लॉकडाऊनमुळे सलून व बँड व्यावसायिकांचे व्यवसाय बंद असल्याने उपासमारीची पाळी आली आहे. आर्थिक संकटात मदत करावी, या हेतूने आमदार बंटी भांगडिया यांनी ही मदत पोहोचती केली. यावेळी शंकरपूर जिल्हा परिषद क्षेत्रप्रमुख अविनाश बारोकर, अनिल शेंडे, जगदीश श्रीरामे, कन्नू बघेल, ईश्वर भरडे, आदी उपस्थित होते.
===Photopath===
290521\img-20210529-wa0050.jpg
===Caption===
किराणा किट चे वाटप करताना भाजप पदाधिकारी