राजुरा : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने डोके वर काढले असल्याने सरकारी तसेच खासगी रुग्णालयामध्ये बेड तसेच ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेड मिळणे कठीण झाले आहे. कोरोना रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी हजरत टिपू सुलतान फाउंडेशन या सामाजिक संघटनेमार्फत शहीद टिपू सुलतान यांच्या २२२व्या पुण्यतिथीनिमित्त ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, ऑक्सिमीटर, फ्लोमीटर, हँड सॅनिटायजर, पीपीई किट, सॅनिटायजर हँड पंप, ऑक्सिजन सिलिंडरचे लोकार्पण हजरत टिपू सुलतान फाउंडेशनचे अध्यक्ष अमजद शेख यांच्या
हस्ते करण्यात आले. याप्रसंगी अमीर शेख, रमिज शेख, जुबेर आजाद, ॲड. नवाज शेख, मुहम्मद शाकिब, तनवीर पटेल, अझहर खान, हाजी फैसल पाशा, आजाद खान, गुल्फाम रिज्वी, जमीर शेख, अमीन शेख, शहबाज शेख, असद खान, अरबाब शेख, सलीम शेख, अरमान शेख, दानिश ताजी, फराज शेख, सज्जू शेख, तोहीद खान, सलमान शेख, इमरान खान, नईम शेख, जफर बेग, अझहर अली, अफजल अली आणि अतिक रजासह मान्यवर उपस्थित होते, असी माहिती हजरत टिपू सुलतान फाउंडेशन कोरपनाचे अध्यक्ष अबरार अली यांनी दिली.