लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना प्रादुभार्वाच्या काळात जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरू आहे. जून महिन्यात शिधापत्रिका धारकांना एक लाख ८४ हजार ४३६ क्विंटल धान्य वितरण करण्यात आले. या कालावधीत धान्याची टंचाई भासवून चढ्या भावाने विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले.जिल्ह्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतंर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे १५ लाख ५३ हजार २२३ आहेत. या लाभार्थ्यांना १ हजार ५३३ स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो. बीपीएल कार्ड असलेल्या लाभार्थ्यांना अंत्योदय योजनेअंतर्गत दोन रूपये किलो दराने प्रति कार्ड १५ किलो गहू आणि तीन रूपये किलो दराने प्रति कार्ड २० किलो तांदूळ दिला जातो. शिवाय २० रुपये किलो दराने एक किलो साखर दिली जाते. केशरी रेशनकार्ड असलेल्या प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना दोन रूपये किलो दराने प्रति व्यक्ती तीन किलो गहू आणि तीन रूपये किलो दराने प्रति व्यक्ती दोन किलो तांदूळ दिला जातो. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत एप्रिल ते जूनपर्यंत प्रति लाभार्थी पाच किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे.पात्र रेशनकार्ड धारकाने नियमित स्वस्त धान्य खरेदी केल्यानंतर त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला पाच किलो अतिरिक्त तांदूळ मोफत देण्याची सूचना केंद्र शासनाने व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे दिली आहे. त्यामुळे आता प्रत्येक पात्र रेशन कार्डधारकाला नियमित धान्य घेतल्यानंतर प्रति व्यक्ती पाच किलो तांदुळ कुटुंबातील जणांच्या संख्येनुसार मोफत उपलब्ध करून दिली जात आहे.साडेसात हजार क्विंटल डाळ वाटपप्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतंर्गत माहे जून महिन्यामध्ये ७५ हजार ५९३ क्विंटल तांदूळ व ८ हजार ६६४ क्विंटल डाळ वाटप करण्यात आले. या योजनेतंर्गत माहे जुलै ते नोव्हेंबर पर्यंत मोफत धान्य वितरण करायचे. यामध्ये ३ किलो गहू व २ किलो तांदूळ मोफत देण्यात येणार आहे. एपीएल योजनेचे धान्य वाटपाची मदतही जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांसाठी वाढविण्यात आली आहे.पोर्टबिलीटी यंत्रणेचा प्रभावी वापरराष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतंर्गत माहे जून महिन्यामध्ये सुमारे ५० हजार ४१३ क्विंटल गहू, ४७ हजार १७७ क्विंटल तांदूळ, तर एक हजार ३५२ क्विंटल साखरेचे वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर स्थलांतरीत झालेले परंतु, लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेल्या सुमारे ५ हजार ५९ शिधापत्रिका धारकांनी ते जेथे राहत आहे. त्याठिकाणी शासनाच्या पोर्टबिलीटी यंत्रणेतंर्गत ऑनलाईन पद्धतीने अन्नधान्य घेतले आहे.जून महिन्यात चढ्या भावाने जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणाऱ्या ५ दुकानदारांविरूद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जीवनावश्यक वस्तू व औषधांची कोणतीही टंचाई नाही. किराणा दुकानांमधून वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा, याकरिता यंत्रणा खबरदारी घेत आहे.- राजेंद्र मिस्कीन, जिल्हा पुरवठा अधिकारी, चंद्रपूर
एक लाख ८४ हजार ४३६ क्विंटल धान्य वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 5:00 AM
रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे १५ लाख ५३ हजार २२३ आहेत. या लाभार्थ्यांना १ हजार ५३३ स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो. बीपीएल कार्ड असलेल्या लाभार्थ्यांना अंत्योदय योजनेअंतर्गत दोन रूपये किलो दराने प्रति कार्ड १५ किलो गहू आणि तीन रूपये किलो दराने प्रति कार्ड २० किलो तांदूळ दिला जातो. शिवाय २० रुपये किलो दराने एक किलो साखर दिली जाते.
ठळक मुद्देजून महिन्याचे उद्दिष्ट पूर्ण : जिल्ह्यात अन्नधान्याची कमतरता नाही