चंद्रपूर : रोटरी क्लब ऑफ चंद्रपूरतर्फे एड्सग्रस्ता प्रोटिन पावडरचे वितरण करण्यात आले. मागील चार वर्षांपासून ३० ते ४० जणांना प्रत्येक महिन्यात प्रोटिनचे वितरण करण्यात येत आहे. त्यामुळे प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होत आहे.एड्स रोगामुळे रुग्णांची रोगप्रतिकार शक्ती कमी होते. त्यामुळे विविध आजारांना सामोरे जावे लागते. या आजारावर कोणताही उपाय नाही. केवळ साधगीरी बाळगता येते. रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी प्रोजेक्ट डायरेक्टर डॉ. आसावरी देवतळे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम सुरु आहे. रोटरीतर्फे गरजू रुग्णांना प्रोटिन पावडरचे वितरण करण्यात आले. त्यामुळे त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढली असल्याचे दिसून आले. त्यामुळे हा उपक्रम सतत चालू ठेवण्यात येणार आहे. यावेळी क्लबचे अध्यक्ष श्रीकांत रेशीमवाले, सचिव अविनाश उत्तरवार, मंगरूळकर आदी उपस्थित होते.
रोटरी क्लबतर्फे प्रोटिन पावडरचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 4:33 AM