लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मुलींना पळवून नेण्याच्या घटना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढीस लागल्याची आकडेवारी पोलीस प्रशासनाच्या गुन्हे विषयक अहवालातून स्पष्ट होत आहे. अशा सामाजिक अपराधांबाबत पोलीस प्रशासन गंभीर नसल्यामुळे या गुन्ह्यांची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. सामाजिक स्तरावर असुरक्षिततेचे वातावरण पसरले असल्याने जिल्हा पोलीस प्रशासनाद्वारे अशा गुन्ह्यांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करून कठोर कारवाईची भुमिका स्वीकारावी, असे सक्त निर्देश केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिले.स्थानिक शासकीय विश्रामगृहात मंगळवारी जिल्ह्यातील विविध प्रकारच्या गुन्हे विषयक प्रकरणांचा जिल्हा पोलीस प्रशासनाकडून त्यांनी आढावा घेतला. जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर व प्रशासनातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीमध्ये ना. अहीर यांनी अनेक गंभीर गुन्ह्याकडे पोलीस प्रशासनाचे लक्ष वेधले. अशा गुन्ह्यांची उकल करण्यासाठी तपास कार्याला गती द्यावी, तपास अधिकाऱ्यांना कालबध्द अवधीमध्ये तपासाचा छडा लावण्याची सूचना द्यावी व अशा गंभीर प्रकरणांच्या तपास प्रक्रियेबाबत वरिष्ठांनी वेळोवेळी आढावा घेवून कार्य अहवाल मागवावा, अशी सूचनाही ना. अहीर यांनी यावेळी केली.फुस लावून पळवून नेलेल्या १८ वर्षांखालील मुलींची वैद्यकीय तपासणी अनिवार्य केली जावी, भादंवि कलम ३७६, ३५४ व पास्को यासारख्या कलमांचा अपराधाची तीव्रता व परिस्थितीजन्य पुराव्याच्या पार्श्वभूमिवर वापर केला जावा. तरच अशा असामाजिक कृत्य करणाºया प्रवृत्तींवर पायबंद घालणे शक्य होईल. सन २०१३ ते २०१७ पर्यंतच्या गुन्हेविषयक अहवालानुसार अपहरण, फुस लावून व लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन व सज्ञान मुली पळवून नेण्याचे आकडे चिंतेत भर घालणारे आहे, असे ना. अहीर म्हणाले. या बैठकीला विजय राऊत, खुशाल बोंडे, राहुल सराफ, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हेमराजसिंग राजपुत, एसडीपीओ सुशिलकुमार नायक, शेखर देशमुख, पवार, हिरे, पोलीस निरीक्षक गोतमारे, भगत, आमले, शिरस्कर यांची उपस्थिती होती.उपाययोजना करासन २०१३ मध्ये २६, २०१४-३८, २०१५-९८, २०१६-८४ व २०१७ मध्ये मुलीला पळवून किंवा फुस लावून नेण्याच्या १५६ अशा ४०२ गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनांचे गांभीर्य लक्षात घेवून प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना ना. अहीर यांनी पोलिसांना केल्या.
जिल्ह्यात ४०२ मुलींना फूस लावून पळविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 10:32 PM
मुलींना पळवून नेण्याच्या घटना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढीस लागल्याची आकडेवारी पोलीस प्रशासनाच्या गुन्हे विषयक अहवालातून स्पष्ट होत आहे. अशा सामाजिक अपराधांबाबत पोलीस प्रशासन गंभीर नसल्यामुळे या गुन्ह्यांची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे.
ठळक मुद्देआढावा बैठक : आळा घालण्याचे केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना निर्देश