लोकमत न्यूज नेटवर्कचंद्र्रपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या आदेशानुसार रूग्णवाहिकांचे भाडे निश्चित करण्यात आले आहे. यापेक्षा अधिक भाडे आकारल्यास किंवा इतर तक्रारीसाठी नागरिकांना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात तक्रार दाखल करता येणार आहे.२५ किलो मीटर अथवा दोन तासाकरिता तसेच प्रति किलोमीटर याप्रमाणे भाडे निश्चित केलेले आहे. मारूती व्हॅन या वाहनाचा २५ किलो मीटर अथवा दोन तासाकरिता ६०० तर १२ रूपये प्रति किलो मीटर भाडे दर निश्चित करण्यात आले आहे. टाटा सुमो व मेटॅडोर सदृश्य कंपनीने बांधणी केलेली वाहनाचा २५ किलो मीटर अथवा दोन तासाकरिता ७०० तर १२ रूपये प्रति किलो मीटर भाडे दर निश्चित केले आहे. टाटा ४०७, स्वराज आदींच्या बांधणी केलेली वाहने, विंगर, टेम्पो ट्रॅव्हलर वाहनाचा २५ किलो मीटर अथवा दोन तासाकरिता ८०० रूपये तर १८ रूपये प्रति किलो मीटर भाडे दर निश्चित केले आहे. आयसीयू व वातानुकूलित वाहनाचा २५ किलो मीटर अथवा दोन तासाकरिता १ हजार तर २२ रुपये प्रति किलोमीटर भाडे प्रशासनाकडून निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे रुग्णवाहिका संचालकांच्या मनमानीला चाप बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
रूग्णवाहिकांच्या मनमानीवर जिल्हा प्रशासनाची नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2020 5:00 AM
मारूती व्हॅन या वाहनाचा २५ किलो मीटर अथवा दोन तासाकरिता ६०० तर १२ रूपये प्रति किलो मीटर भाडे दर निश्चित करण्यात आले आहे. टाटा सुमो व मेटॅडोर सदृश्य कंपनीने बांधणी केलेली वाहनाचा २५ किलो मीटर अथवा दोन तासाकरिता ७०० तर १२ रूपये प्रति किलो मीटर भाडे दर निश्चित केले आहे. टाटा ४०७, स्वराज आदींच्या बांधणी केलेली वाहने, विंगर, टेम्पो ट्रॅव्हलर वाहनाचा २५ किलो मीटर अथवा दोन तासाकरिता ८०० रूपये तर १८ रूपये प्रति किलो मीटर भाडे दर निश्चित केले आहे.
ठळक मुद्देदर जाहीर : आरटीओकडे करता येणार तक्रार