जिल्हाधिकारी : रुपे डेबीट कार्डचा शुभारंभचंद्रपूर : बँकाशी सामान्य जनता जुळली पाहिजे बलुतेदार, पगारदार, शेतकरी वर्ग, विद्यार्थी, महिला बचत गट यांच्यासोबतच तळागळातील दुर्बल घटकांशी बँकेने नाते जोडले पाहिजे, त्यांच्यात विश्वासार्हता निर्माण झाली पाहिजे. या सर्व बाबी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये जाणवल्या, असे मत जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी व्यक्त केले. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेद्वारे आयोजित रुपे डेबिट कार्ड शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार सुभाष धोटे, मुख्य कार्यपालन अधिकारी आशुतोष सलिल, बँकेचे अध्यक्ष शेखर धोटे, नाबार्ड चंद्रपूरचे सहायक महाप्रबंंधक डी.टी. डेकाटे, बँकेच्या उपाध्यक्ष प्रभाताई वासाडे, संचालक मनोहर पाऊणकर, अनिल खनके, विजय बावणे, दिलीप नलगे, संजय तोटावार, दामोधर रुयारकर, पुंडलिक कढव, प्रा. ललित मोटघरे, उल्हास करपे, पांडूरंग जाधव, नंदाताई अल्लुरवार, आयसीआयसीआय बँकेचे राजेश सराफ, ट्रस्ट सिस्टीम अॅन्ड सॉप्टवेअरचे हेमंत चाफले, वैभव कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.रुपे डेबिट कार्डच्या सहाय्याने शेतकरी पगारदार विद्यार्थी वर्ग, इतरही नागरिकांना देशाच्या कानाकोपऱ्यातून आर्थिक व्यवहार करता येईल. ही जिल्हा बँकांसाठी फार मोठी उपलब्धी आहे, असेही जिल्हाधिकारी म्हैसेकर म्हणाले. रुपे डेबिट कार्डच्या आधारे सर्वसामान्य जनता बँकेशी सलग्नित होईल. असा आशावाद आमदार सुभाष धोटे यांनी व्यक्त केला. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही महाराष्ट्रातील तिसरी बँक आहे, हा धाडसी निर्णय बँकेने घेतला आहे. अशा विविध योजनांद्वारे बँक सदोदित कार्य करीत राहील, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केले. प्रास्ताविकात बँकेचे अध्यक्ष शेखर धोटे यांनी बँकेच्या प्रगतीची माहिती देत भविष्यात ग्राहक व ठेविदारांना उत्तमोत्तम सेवा देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मुख्य कार्यपालन अधिकारी आशुतोष सलिल, नाबार्ड चंद्रपूरचे सहा. महाप्रबंंधक डी.टी. डेकाटे यांनीही यावेळी गौरवोद्गार काढले. संचालन प्रिती बहादुरे, आभार बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय खेडीकर यांनी मानले. कार्यक्रमाला शेतकरी, पतसंस्थांचे अध्यक्ष, महिला बचत गटाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.(जिल्हा प्रतिनिधी)
जिल्हा मध्यवर्ती बँक शेतकऱ्यांसाठी लाभदायी
By admin | Published: August 26, 2014 11:20 PM