शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
4
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
5
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
6
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
7
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
8
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
9
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
10
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
11
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
12
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
13
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
14
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
15
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
16
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
17
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
18
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
19
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
20
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात

प्राध्यापिकेवरील जीवघेण्या हल्ल्याचा जिल्ह्यात निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2020 6:00 AM

हिगणघाट येथील शिक्षिकेला भरचौकात पेट्रोल टाकून जिंवत जाळणारा आरोपी विकेश नगराळे या नराधमाला फाशी द्या, अशी मागणी भारतीय जनता पार्टीने केली आहे. या संदर्भातील निवेदन भाजपाच्या शिष्टम़ंडळाने बुधवारी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठविले आहे. सदर घटना ही अमानुष असून हे प्रकरण फास्ट ट्रक कोर्टात निकाली काढून नराधमाला फाशी द्या.....

ठळक मुद्देशासनाला निवेदन : हिंगणघाट येथील अमानुष घटनेमुळे समाजमन हादरले

नराधमाला कठोर शिक्षा देण्याची मागणीराजुरा : हिंगणघाट येथील प्राध्यापिका हिच्यावर पेट्रोल टाकून माथेफिरू युवक विक्की उर्फ विकेश नगराळे याने जीवंत जाळण्याचा प्रयत्न केला. राजुरा तालुक्यातील महिला काँग्रेस कमिटीद्वारे आक्रोश व्यक्त करीत प्राणघातक हल्ल्याचा निषेध नोंदवला व पाशवी कृत्य करणाऱ्या मनोविकृत अपराध्याला कठोरात-कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी उपविभागीय अधिकारी राजुरा यांच्याकडे दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. याप्रसंगी महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष कविता उपरे, जि.प. सदस्य मेघा नलगे, मुमताज अब्दुल जावेद, निर्मला कुळमेथे, सुमित्रा कुचनकर, नंदा गेडाम, पुण्यवर्षा जुलमे, कविता उईके, तुकाराम माणूसमारे, दिलीप वांढरे, रवी कुरवटकर यासह महिला काँग्रेसच्या सदस्य उपस्थित होत्या.त्या मनोविकृत्याला फाशी द्यागोंडपिपरी : हिगणघाट येथील शिक्षिकेला भरचौकात पेट्रोल टाकून जिंवत जाळणारा आरोपी विकेश नगराळे या नराधमाला फाशी द्या, अशी मागणी भारतीय जनता पार्टीने केली आहे. या संदर्भातील निवेदन भाजपाच्या शिष्टम़ंडळाने बुधवारी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठविले आहे. सदर घटना ही अमानुष असून हे प्रकरण फास्ट ट्रक कोर्टात निकाली काढून नराधमाला फाशी द्या, अशीही मागणी भाजपाच तालुका अध्यक्ष बबन निकोडे, गणेश डहाळे, प्रशांत येलेवार, स्वाती वडपल्लीवार, नगराध्यक्ष संजय झाडे उपस्थित होते.ठाणेदारांना महिलांचे निवेदनघुग्घुस : हिंगणघाटच्या प्राध्यापिकेवर भ्याड हल्ला करणाºया आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी संगिता बोबडे यांच्या नेतृत्वात येथील महिलांनी केली असून या संदर्भातील निवेदन ठाणेदार राहुल गांगुर्डे यांना देण्यात आले.प्रकरण जलदगतीने न्यायालयात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली. यावेळी सरस्वता पाटील, संगिता देवराव बोबडे, दिपा श्रीवास्कर, तारा बोबडे, रेखा रेगुंडवार, इंदिरा बंडेवार, चैताली खंडारे, निता मालेकर, सूमन बांदूरकर, स्नेहा कुंडले, बबिता कांबळे, ममता संगतवार, संगिता शेरकी उपस्थित होते.वरोऱ्यात महिलांचा मोर्चावरोरा : हिंगणघाट येथील घटनेच्या निषेधार्थ वरोरा शहरात सर्व महिला संघटनेच्या वतीने जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातून उपविभागीय कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चात सभापती अर्चना जीवतोडे, योगिता लांडगे, जि.प. सदस्य सुनंदा जीवतोडे, पल्लवी चवले, माधुरी बोंडे, वैशाली राजूरकर, शकुंतला समर्थ, ममता मरस्कोल्हे, आश्लेषा भोयर, ज्योती किटे, छाया चव्हाण, वनिता पावडे, मंगला पिंपळकर आदी महिला सहभागी झाल्या होत्या.भद्रावतीत तहसीलदारांना निवेदनभद्रावती : हिंगणघाट येथील घटनेचे तीव्र पडसाद भद्रावती शहरातही उमटले. भास्कर ताजणे यांच्या नेतृत्वात अनेक सामाजिक संघटना व त्यांच्या कार्यकर्त्यांनी येथील तहसीदार महेश शितोडे यांच्या मार्फत शासनाला निवेदन दिले. निवेदनातून या घटनेतील विकेश नगराळे याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख भास्कर ताजणे, पांडुरंग टोंगे, अभय खिरटकर, सुधीर सातपुते, लिमेश मानुसमारे, राजू ढेंगळे, शिवशंकर मडावी, जयेश उईके, प्रदीप गोरे, नारायण जगताप, अरूण भोयर, प्रशांत काळे, रूपेश ठेंगणे, अण्णा सातपुते, विनोद नागपुरे, विठ्ठल बदखल आदी उपस्थित होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी