लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाने सिंचनाची सुविधा व्हावी या उद्देशाने राज्य शासनाने धडक सिंचन विहिर हा उपक्रम सुरू केला. या कार्यक्रमांतर्गत चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाला तीन हजार ६१४ विहिरी बांधण्याचे उद्दिष्ट होते. त्यानुसार जिल्ह्यात तीन हजार २८० विहिरींचे बांधकाम पूर्ण झाले असून ३३१ विहिरींचे काम प्रगतीपथावर आहे.कधी कोरडा दुष्काळ तर कधी ओल्या दुष्काळाने शेतकरी नेहमी संकटात सापडले असतात. दुष्काळातून मुक्तता करण्यासाठी राज्य शासनाने सिंचन विहिरींचा धडक कार्यक्रम राबविला. सिंचन विहिरींच्या योजनेमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक पाणी मिळणार आहे.जिल्ह्यातील सरासरी पर्जन्यमान दरवर्षी समाधानकारक राहते. पण, अनियमित व खंडित पाऊस, सिंचनाचा अभाव, यामुळे पिकांवर विपरीत परिणाम होतो. यंदा जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झाले. शेतकºयाच्या उत्पादनात घट झाल्याचे शेतकºयांकडून सांगितले जात आहे. त्याचा ग्रामीण अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होत आहे. यावर कायमस्वरुपी उपाय म्हणून राज्य शासनाने सिंचन विहिरींचा धडक कार्यक्रम राबविला.सिंचन विहिरीच्या योजनेमध्ये आॅनलाईन अर्ज प्राप्त केले जात असून, प्रथम येणाºयास प्राध्यान्य या तत्वावर मंजुरी दिली जाते. हे या योजनेचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे विहिरी मंजुरीला पूर्वी दोन किंवा तीन वर्षे लागायची आता या प्रक्रिया संपुष्टात आली आहे. धडक सिंचन योजना दीड एकरपेक्षा अधिक शेतजमीन असणाºया सर्व प्रवर्गाच्या शेतकºयांसाठी खुली आहे. यामुळे उद्दिष्ट्यापेक्षा दुप्पटीने अर्ज प्राप्त झाले असून, या योजनेस उत्तम प्रतिसाद आहे. सिंचन विहिरींच्या योजनेत लाभार्थ्यांला स्वत:च्या इच्छेनुसार, कंत्राटदाराकडून वा स्वत:च विहिरीचे काम करायचे असते. जिल्हा परिषदेच्या कनिष्ठ अभियंत्याद्वारे मोजमाप झाले की, देयक पंचायत समितीस पाठविले जाते. पंचायत समितीद्वारे लाभार्थी शेतकºयांच्या बँक खात्यात झालेल्या कामाच्या मुल्यांकनाची थेट रक्कम जमा होत आहे. शिवाय योजनेच्या लाभार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी विहीर पूर्ण झाल्यावर विद्युत जोडणीसाठी वीज वितरण कंपनीद्वारे प्राध्यान्याने वीज जोडणी दिली जात आहे. त्यानुसार सिंचन विभागाला सिंचन विहिरींचा धडक कार्यक्रमातंर्गत तीन हजार ६१४ विहिरीचे उदिष्ट्य देण्यात आले होते. त्यापैकी तीन हजार २८० विहिरीचे काम पूर्ण झाले आहेत. ३३१ विहिरींचे काम प्रगतिपथावर असून त्या विहिरीचे काम मार्चअखेरपर्यंत पूर्ण होईल. यासोबतच जिल्हा परिषदेचे सिंचन विहिरीचे उद्दीष्ट पूर्ण होईल, अशी माहिती जि.प. सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक बोकडे यांनी दिली.भाजीपाला लागवडीत वृद्धी -अशोक बोकडेशासनाने राबविलेल्या सिंचन विहिरींचा अनेक शेतकऱ्यांनी फायदा घेतला. अनेकांच्या शेतात मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे. शेतकऱ्यांना गरजेनुसार शेतपिकांना पाणी देणे शक्य झाले आहे. शिवाय, यंदाच्या अनियमित पावसामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना विहिर वरदानच ठरली. जिल्ह्यातील शेतकरी नगदी पिकांसोबतच आता बारमाही पिके घेत असून, भाजीपाला लागवडीत वृद्धी झाले आहे. धडक सिंचन विहिर हा उपक्रम शेतकऱ्यांना वरदान ठरत आहे. सोबतच जि. प. कडून शेतीउपयोगी विविध योजना राबविण्यात येत आहे. त्याचा वापरही शेतकरी करीत असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होत आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता अशोक बोकडे यांनी दिली.
जिल्ह्यात ३,२८० सिंचन विहिरी पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 10:48 PM
दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाने सिंचनाची सुविधा व्हावी या उद्देशाने राज्य शासनाने धडक सिंचन विहिर हा उपक्रम सुरू केला. या कार्यक्रमांतर्गत चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाला तीन हजार ६१४ विहिरी बांधण्याचे उद्दिष्ट होते.
ठळक मुद्दे३३१ विहिरी प्रगतीपथावर : सिंचन विहीर धडक कार्यक्रमातून शेती समृद्धीकडे