जाणून घेतल्या समस्या : सामान्य व्यक्तीप्रमाणे नागरिकांत बसलेपाटण : चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या आदिवासी बहुल नक्षलग्रस्त जिवती तालुक्यातील पेसा अंतर्गत गावाना जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी भेट दिली.तालुक्यातील पाटण ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पाटागुडा सीतागुडा, लचमागुडा या गावांना जिल्हाधिकारी सलील यांनी भेट देऊन गूावातील समस्या जाणून घेतल्या. त्या समस्यांचा निपटारा करण्यासाठी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. गेल्या अनेक वर्षांपासून पाटागुडा गावातील नागरिक नाल्यातील गढूळ पाणी पित असून अर्धे गाव आजारी पडले आहे, अशी माहिती गावपाटील कर्ण मडावी यांनी दिली. पाटण येथे बोगस डॉक्टर आदिवासी गोरगरीब जनतेच्या आरोग्याशी खेळत असून त्यांची लूट केली जात आहे, अशी तक्रार शेख आदिक यांनी केली.पेसाअंतर्गत गावातील तक्रारी लवकरच निकाली काढणार, असे आश्वासन जिल्हाधिकारी सलील यांनी गावकऱ्यांना दिली. त्यांच्यासोबत पाटण ग्रामपंचायतचे सरपंच सुषमा मडावी, उपसरपंच भीमराव पवार, वाघु उईके, प्रभाकर उईके व तालुक्यातील अधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)जिल्हाधिकाऱ्यांचा साधेपणाजिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी अतिशय साधेपणाने गावातील नागरिकांसोबतच खाली चटईवर बसून चर्चा केली. त्यानी खुर्चावर बसन्याचे टाळले. त्यांच्या साधेपनाचा व सर्वसामान्य वागणुकीमुळे गावकरी भारावले.
जिवती तालुक्यातील गावांना जिल्हाधिकाऱ्यांची भेट
By admin | Published: September 28, 2016 12:56 AM