लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कुटुंब कल्याण कार्यक्रमात चंद्रपूर जिल्ह्याने राज्यात दुसरा क्रमांक पटकाविला. या कल्याणकारी कार्यक्रमात सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या ४७ आरोग्य कर्मचाऱ्यांचा सोमवारी जि. प. परिषदेतील मा. सा. कन्नमवार सभागृहात प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी अॅनिमिया मुक्त भारत मोहिमेचे उद्घाटन जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी केले.मंचावर वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. एस. एस. मोरे, दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्थेचे विशेष कार्य अधिकारी उदय मेघे, जि. प. उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती क्रिष्णा सहारे, महिला व बालकल्याण सभापती गोदावरी केंद्रे, कृषी व पशुसंवर्धन सभापती अर्चना जीवतोडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी अशोक मातकर, जिल्हा कृषी अधिकारी शंकर किरवे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. बिसेन, आरोग्य समितीचे सदस्य मानिक घोडमारे, रेखा कारेकार, शितल बांबोडे, मनिषा चिमूरकर, विद्या किन्नाके, वैशाली शेरकी, निलेश देवतळे व अन्य अधिकारी उपस्थित होते.जि. प. अध्यक्ष भोंगळे म्हणाले, वैद्यकीय क्षेत्रात भरारी घेतल्याने मानवाचे जीवन सुरक्षित झाले. पण लोकसंख्या नियंत्रणात आणू शकलो नाही. यापुढे प्रभावी पावले उचलू शकलो नाही तर साधन संपत्ती, सेवा अपुरी पडणार आहे. देशातील पिढी सुखी, समृध्द तसेच सुरक्षित ठेवण्याकरीता लोकसंख्या नियंत्रणाची गरज आहे. त्यामुळे अधिकारी व कर्मचाºयांनी रूग्णांना चांगली वागणूक आरोग्य सेवा द्यावी, असेही त्यांनी सांगितले. उपाध्यक्ष क्रिष्णा सहारे यांनी कर्मचाºयांनी केवळ वेतनाचा विचार न करता लोकांना उत्तम आरोग्य सेवा देण्यासाठी सहकार्य करण्याची आवश्यकता नमुद केली. डॉ. राजकुमार गहलोत यांनी प्रास्ताविकेतून आरोग्य योजनांची माहिती दिली. संचालन अरूणा गतफने यांनी केले. डॉ. गजानन राऊत यांनी आभार मानले. कार्यक्रमाला सुभाष सोरते, छाया पाटील, एस. पी. दुपारे, अशोक तुरारे व जि. प. आरोग्य विभागातील कर्मचाºयांनी सहकार्य केले.मूल उपजिल्हा रूग्णालयाला डॉ. आनंदीबाई जोशी पुरस्कारराज्यातील माता मृत्यू व बाल मृत्युचे प्रमाण कमी करणे आणि कुटुंब कल्याण कार्यक्रमाची यशस्वीपणे अंमलबजावणी केल्याने मूल येथील उपजिल्हा रुग्णालयाला डॉ. आनंदीबाई जोशी प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला. याशिवाय प्राथमिक आरोग्य केंद्र नवेगाव पांडव, मांडवा, चिचपल्ली तसेच गंगासागर हेटी, आवळगाव, मोहर्ली येथील आरोग्य उपकेंद्रेही पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.
कुटुंबकल्याण कार्यक्रमात जिल्हा अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 11:24 PM
कुटुंब कल्याण कार्यक्रमात चंद्रपूर जिल्ह्याने राज्यात दुसरा क्रमांक पटकाविला. या कल्याणकारी कार्यक्रमात सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या ४७ आरोग्य कर्मचाऱ्यांचा सोमवारी जि. प. परिषदेतील मा. सा. कन्नमवार सभागृहात प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी अॅनिमिया मुक्त भारत मोहिमेचे उद्घाटन जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी केले.
ठळक मुद्दे४७ आरोग्यसेवक पुरस्काराचे मानकरी : अॅनिमियामुक्त भारत मोहिमेला सुरुवात