लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्याला गॅसयुक्त बनवून धूरमुक्त करण्याकरिता जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुरू केलेले १०० टक्के गॅस कनेक्शन अभियान पूर्णत्वास येत आहे. येत्या १५ आॅगस्ट २०१९ रोजी चंद्र्रपूर जिल्हा १०० टक्के गॅसयुक्त झाल्याची घोषणा करण्यात येणार आहे. त्याकरिता जिल्हा प्रशासन पुरवठा विभागाकडून युद्धपातळीवर काम सुरू आहे. उर्वरित ग्राहकांनी तात्काळ गॅस तसेच धान्य मिळवण्यासाठी ५ आॅगस्टपयत नोंदणीसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.शासनाच्या पुरवठा विभागाने पंडित दीनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियानाची सुरुवात १५ जुलै २०१९ झाली. हे अभियान १४ आॅगस्ट २०१९ पर्यंत सुरू असणार आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री मुनगंटीवार यांनी या अभियानाची सुरुवात जिल्ह्यात केली होती.सर्व पात्र कुटुंबांना १०० टक्के शिधापत्रिका वाटप, सर्व पात्र शिधापत्रिकांना १०० टक्के धान्य वाटप करणे, सर्व कुटुंबांना १०० गॅस कनेक्शन देणे असा आहे.धूरमुक्त जिल्हा संकल्पना राबवण्यासाठी ज्या कुटुंबाकडे गॅस कनेक्शन नाही. त्या कुटुंबातील महिलांनी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना विस्तारित २ मधून केवायसी फार्ममध्ये १४ निकषांवर आधारित असलेले हमीपत्र भरून द्यायचा आहे. त्याच सोबत रेशनकार्ड झेरॉक्स, रेशनकार्ड मधील १८ वर्षांवरील व्यक्तींचे आधार कार्डची झेरॉक्स, दोन फोटो, बँक पासबुक झेरॉक्स, लगतच्या गॅस एजन्सी किंवा केरोसीन व रास्तभाव दुकानदाराकडे द्यावे. तहसील कार्यालयातील पुरवठा अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करावा. कागदपत्रांची छाननी पूर्ण होताच १०० रुपयात कनेक्शन मिळणार आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी मिस्कीन यांनी दिली.
जिल्हा १०० टक्के गॅसयुक्त होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 10:56 PM
जिल्ह्याला गॅसयुक्त बनवून धूरमुक्त करण्याकरिता जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुरू केलेले १०० टक्के गॅस कनेक्शन अभियान पूर्णत्वास येत आहे. येत्या १५ आॅगस्ट २०१९ रोजी चंद्र्रपूर जिल्हा १०० टक्के गॅसयुक्त झाल्याची घोषणा करण्यात येणार आहे. त्याकरिता जिल्हा प्रशासन पुरवठा विभागाकडून युद्धपातळीवर काम सुरू आहे. उर्वरित ग्राहकांनी तात्काळ गॅस तसेच धान्य मिळवण्यासाठी ५ आॅगस्टपयत नोंदणीसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
ठळक मुद्देप्रशासनाकडून जोमाने प्रयत्न : १५ आॅगस्टला घोषणा