पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते शुक्रवारी शासकीय विश्रामगृह, ब्रह्मपुरी येथे अत्याधुनिक फिरते दवाखान्याचे लोकार्पण होणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या उपस्थित राहणार आहे.
बाॅक्स
भारतात प्रथमच मोबाईल ट्रॅकिंग सिस्टीम व डॉक्टर पेशंट ॲप टेक्नॉलॉजीने फिरता दवाखाना परिपूर्ण असणार आहे. या दवाखान्याचे वैशिष्ट्य म्हणजे नागरिकांना मोफत औषधे, मोफत आरोग्य तपासणी, मोफत डायबिटीस व ब्लड प्रेशर तपासणी, मोफत प्राथमिक औषधोपचार अँड ड्रेसिंग त्यासोबतच कोविड काळात मोफत कोरोना टेस्टिंग उपलब्ध राहणार आहे.
या फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील ग्रामीण व दुर्गम भागांमध्ये नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे. नागरिकांनी आपल्या अँड्रॉइड मोबाईलमध्ये पेशंट ॲप डाऊनलोड करावे व या सुविधेचा लाभ घ्यावा, असे कळविण्यात आले आहे.