जिल्हा युवक कॉंग्रेस वडेट्टीवार गटाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 12:24 AM2018-09-14T00:24:01+5:302018-09-14T00:26:01+5:30

अखिल भारतीय युवक कॉंग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीत चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेसवर कॉंग्रेस विधीमंडळ उपगटनेते आ. विजय वडेट्टीवार गटाने कब्जा केला आहे. पाच विधानसभा अध्यक्षपद आ. वडेट्टीवार गटाने जिंकली आहे.

District Youth Congress vadittivar group | जिल्हा युवक कॉंग्रेस वडेट्टीवार गटाकडे

जिल्हा युवक कॉंग्रेस वडेट्टीवार गटाकडे

Next
ठळक मुद्देहरिश कोतावार जिल्हाध्यक्ष : शिवाणी वडेट्टीवार व शंतनु धोटे महासचिव

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : अखिल भारतीय युवक कॉंग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीत चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेसवर कॉंग्रेस विधीमंडळ उपगटनेते आ. विजय वडेट्टीवार गटाने कब्जा केला आहे. पाच विधानसभा अध्यक्षपद आ. वडेट्टीवार गटाने जिंकली आहे. युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सामान्य कार्यकर्ता हरीश कोतावार यांनी नरेश पुगलिया गटाचे करण पुगलिया यांचा १०५० वर मतांनी दारूण पराभव केला. जिल्हा महासचिवपदी आ. वडेट्टीवार यांची कन्या शिवाणी वडेट्टीवार व माजी आमदार सुभाष धोटे यांचे पुतणे शंतनु धोटे मताधिक्याने विजयी झाल्याचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी पत्रकात म्हटले आहे.
चंद्रपूर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षपदी माजी नगरसेवक राजेश अड्डूर, वरोरा सतीश वानखेडे, चिमूर दीपाली पाटील, ब्रह्मपुरी प्रशांत चिमूरकर, राजुरा इजाज शेख, तर बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातून उपाध्यक्षपदी आकाश आदेवार हे निवडून आले. यामध्ये आ. विजय वडेट्टीवार यांची मुलगी चंद्रपूर जिल्हा महासचिव पदी शिवाणीवडेट्टीवाराा, माजी आमदार सुभाष धोटे यांचे पुतने शंतनु धोटे हे प्रचंड मतांनी निवडून आले. त्याचबरोबर वडेट्टीवार गटाचे हाजी इकबाल खान, सुमित चंदनखेडे हे सुद्धा महासचिव म्हणून विजयी झाले.
पक्षांतर्गत असलेल्या या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील काँग्रेसचे दिग्गज नेते आ. विजय वडेट्टीवार, माजी आमदार सुभाष धोटे, जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, शहर जिल्हाध्यक्ष नंदू नागरकर, युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष शिवाराव यांच्यासह विधानसभा क्षेत्रातील नेत्यांची प्रतिष्ठापणाला लागली होती.

Web Title: District Youth Congress vadittivar group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.