रवी जवळे ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना संसर्ग कधी वाढत आहे तर कधी कमी होत आहे. आतापर्यंत एक लाख १९ हजार ५२० चाचण्या करण्यात आल्या. त्यातील १५६३५ इतके नमुने पॉझिटिव्ह निघाले आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात मृत्यू दर कमी करण्यात आरोग्य विभागाला यश येत आहे. राज्याच्या तुलनेत चंद्रपूर जिल्ह्याचा मृत्यू दर कमी म्हणजे केवळ १.३८ टक्केच आहे. ही बाब जिल्ह्यासाठी दिलासादायक आहे. आतापर्यंत १२ हजार ५२२ रुग्णांनी कोरोनाला हरविले असून ते आपापल्या घरी परतले आहेत. आता केवळ २ हजार ८२२ रुग्णांवर उपचार सुरू आहे.रुग्ण विलंबाने होतात दाखलअजूनही कोरोना चाचणीविषयी लोकांमधील गैरसमज दूर झालेले नाही. आजार लपवित आहेत. आजार गंभीर झाल्यावर मग रुग्णालयात दाखल होतात. त्यामुळे मृत्यू ओढवण्याची शक्यता अधिक असते.घरोघरी जाऊन होताहेत तपासण्याराज्याच्या तुलनेत जिल्ह्याचा मृत्यूदर कमी आहे. सध्या जिल्ह्याचा मृत्यूदर १.३८ टक्के आहे. कोरोना रुग्णाचा मृत्यू होऊ नये, यासाठी आरोग्य विभागाकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेद्वारे घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी केली जात आहे. चाचण्या वाढविल्या आहेत. तज्ज्ञ डाक्टरांना नियुक्त केले आहे.- राजकुमार गहलोत,जिल्हा आरोग्य अधिकारी, चंद्रपूर.
जिल्ह्याचा १.३८ टक्के मृत्यू दर राज्यापेक्षा बराच कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2020 5:00 AM
राज्याच्या तुलनेत जिल्ह्याचा मृत्यूदर कमी आहे. सध्या जिल्ह्याचा मृत्यूदर १.३८ टक्के आहे. कोरोना रुग्णाचा मृत्यू होऊ नये, यासाठी आरोग्य विभागाकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेद्वारे घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी केली जात आहे. चाचण्या वाढविल्या आहेत. तज्ज्ञ डाक्टरांना नियुक्त केले आहे.
ठळक मुद्देमाझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेचे फलित : नागरिकांनो लक्षणे दिसताच करा चाचणी