प्रवीण खिरटकर ।लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : ३ नोव्हेंबर २०१८ रोजी वरोरा तालुक्यातील अर्जुनी गावातील महिलेवर जंगलानजिक बिबट्याने हल्ला करून ठार केले. मृत महिलेला एक मुलगा व एक मुलगी असून दोघेही दिव्यांग आहेत. ग्रामस्थांच्या मदतीने आर्थिक मदत मिळावी म्हणून वन विभागाकडे कागदपत्र सुर्पूद केले. आज एक वर्षाच्या कालावधी लोटला. परंतु मृतकाच्या दोन्ही दिव्यांग मुलांना आर्थिक मदत वनविभागाकडून मिळाली नाही. वनविभागाच्या बफर व कोअर झोनच्या वादात आर्थिक मदत अडली असल्याचे समजते.वरोरा तालुक्यातील अर्जुनी गावात एका डोळ्याने अंध असलेली तुळसाबाई किसन केदार आपल्या हरीदास व संगिता या दोन दिव्यांग मुला-मुलीसोबत राहत होती. तुळसाबाईला पती नाही. त्यामुळे संसाराचा गाडा चालविण्याची जबाबदारी तिच्यावरच होती. घरी शेती नसल्याने व मुले दिव्यांग असल्याने स्वत: तुळसाबाई मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करीत होती. अशातच ३ नोव्हेंबर २०१८ या दिवशी अर्जुनी गावानजिक असलेल्या भाणूसविक येथे तुळसाबाई गेली. तेथे बिबट्याने तुळसाबाईवर हल्ला करून जागीच ठार केले. घटनेनंतर वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी आले. घटनेचा पंचनामा पूर्ण केल्यानंतर अर्जुनी ग्रामस्थांच्या सहकार्याने अंत्यसंस्कार करण्यात आले. नुकसान भरपाईसाठी वनविभागाने मागितलेले प्रत्येक कागदपत्र गावकऱ्यांच्या सहकार्याने वनविभागाला देण्यात आले. परंतु आज एक वर्षाचा कालावधी लोटूनही त्या अंध बहीण-भावाला आर्थिक मदत मिळाली नाही. अर्जुनी गावाच्या शिवारात बफर क्षेत्र आहे तर त्यापुढे ताडोबाचे कोअर झोन लागते. तुळसाबाईवर कोअर झोनमध्ये बिबट्याने हल्ला केल्याचे वनविभागाचे म्हणणे आहे. दरम्यान, याबाबत ताडोबा कोअर झोनचे वनपरिक्षेत्र अधिकारी सतीश शेंडे यांच्याशी संपर्क साधला असता ताडोबा कोअर झोन कार्यालयातून मृतक तुळसाबाईच्या वारसांना मदत देण्याचा प्रस्ताव विभागीय कार्यालयाकडे पाठविण्यात आल्याचे ते म्हणाले.१५ ते २० फुटांनी केला घाततुळसाबाई केदार बफर झोनमधून १५ ते २० फुट अंतरावर गेल्या होत्या. तिथे कोअर झोन लागते. बिबट्याने तिथेच हल्ला करून त्यांना ठार मारल्याचे सांगितले जात आहे. परंतु बिबट्याने तुळसाबाईवर बफर झोनमध्ये हल्ला करून फरफटत कोअर झोनमध्ये नेले, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहेभावंडांना आनंदवनाने दिले छतकर्मयोगी बाबा आमटे यांची तिसरी पिढी समाजसेवेचे व्रत चालवत आहे. अशातच महारोगी सेवा समितीचे सचिव डॉ. विकास आमटे व आनंदवानाचे प्रभारी सरपंच तसेच महारोगी सेवा समितीचे विश्वस्त सुधाकर कडू यांना मृत तुळसाबाईला हरिदास व संगिता अशी अंध मुले असल्याची माहिती मिळताच त्यांनी दोघांनाही आनंदवनात आणले. आनंदवनात हातमाग विभागात काम दिले. हरिदासची पत्नी दिव्यांग असून त्यांना एक मुलगी आहे. ती अंशत: अंध आहे. निराधार झालेल्या केदार कुटुंबियास आनंदवनाने छत दिले.
दिव्यांग वारस एक वर्षापासून आर्थिक मदतीच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2019 6:00 AM
वरोरा तालुक्यातील अर्जुनी गावात एका डोळ्याने अंध असलेली तुळसाबाई किसन केदार आपल्या हरीदास व संगिता या दोन दिव्यांग मुला-मुलीसोबत राहत होती. तुळसाबाईला पती नाही. त्यामुळे संसाराचा गाडा चालविण्याची जबाबदारी तिच्यावरच होती. घरी शेती नसल्याने व मुले दिव्यांग असल्याने स्वत: तुळसाबाई मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करीत होती.
ठळक मुद्देसंडे अँकर । क्षेत्राच्या वादात अडली मदत, बिबट्याच्या हल्ल्यात आईचा झाला होता मृत्यू