घुग्घुस : नकोडा ग्रामपंचायतच्यावतीने अपंग कल्याण निधीतून ३५ दिव्यांगांना पाच हजार रुपयांची अन्नधान्याची किट जि. प.सदस्य ब्रिजभूषण पाझारे यांच्या हस्ते सरपंच किरण बांदूरकर यांच्या उपस्थितीत वितरित करण्यात आली.
दरवषीप्रमाणे ग्रामपंचायतच्या पाच टक्के अपंग कल्याण निधीतून आवश्यक वस्तूचे वितरण करण्यात येते. यावर्षी नोंदणीकृत दिव्यांग असलेल्या ३५ दिव्यांगाना पाच हजार रुपये किमतीची अन्नधान्याची किट ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोरील पटांगणात जि. प. सदस्य ब्रिजभूषण पाझारे यांच्या हस्ते वितरित करण्यात आली. यावेळी सरपंच किरण बांदूरकर, उपसरपंच मंगेश राजगडकर, सदस्य तनुश्री बांदूरकर, अर्चना पाझारे, सुजाता गिड्डे, हेमा ताला, विठ्ठल (रज्जत) तुरणकर, जसप्रितसिंग कोर, प्रभाकर लिंगमपेल्ली, कंपा राजय्या, सोनाली येंगलवार, अरुणा पटेल, माजी सरपंच रूषीजी कोवे, तसेच नकोडा भाजप अध्यक्ष बाळकृष्ण झाडे, संघटक महादेव वाघमारे, उपाध्यक्ष सोमनाथ वाटाणे, सचिव पंढरी कोवे आदी उपस्थित होते.
===Photopath===
020621\img_20210530_144317.jpg
===Caption===
दिव्यागांना अन्नधान्य व आवश्यक वस्तूची किट किट वितरण करताना जी.प.सदस्य ब्रिजभूषण पाझारे सरपंच किरण बांदूरकर