शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

खरीप हंगामात बियाणे कमी पडू देऊ नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 12:06 AM

खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना योग्य प्राधिकृत बियाणे, मुबलक व मागणीनुसार मिळावे, यासाठी जिल्हा कृषी यंत्रणेने यंत्रणा सज्ज करावी. बियाण्यांची जिल्ह्यात सर्वत्र मूबलक उपलब्धता आहे. शेतकऱ्यांनी प्राधिकृत बियाणे कृषी केंद्रांमधून पावतीसह खरेदी करावे.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांचे निर्देश : जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना योग्य प्राधिकृत बियाणे, मुबलक व मागणीनुसार मिळावे, यासाठी जिल्हा कृषी यंत्रणेने यंत्रणा सज्ज करावी. बियाण्यांची जिल्ह्यात सर्वत्र मूबलक उपलब्धता आहे. शेतकऱ्यांनी प्राधिकृत बियाणे कृषी केंद्रांमधून पावतीसह खरेदी करावे. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांची पेरणीच्या काळामध्ये बियाणे, खते, वीज पुरवठ्यासाठी अडचण होऊ नये. कृषी केंद्रांकडून फसवणूक होता कामा नये. यासाठी संबंधित यंत्रणा सज्ज करण्याचे निर्देश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनामध्ये रविवारी खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते.यावेळी आमदार नाना श्यामकुळे, आमदार अ‍ॅड. संजय धोटे, महापौर अंजली घोटेकर, जि. प. कृषी सभापती अर्चना जीवतोडे, समाज कल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे, मनपा आयुक्त संजय काकडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील व विभागप्रमुख उपस्थित होते. जिल्ह्यात उपलब्ध असणाºया बियाण्यांची स्थिती, खतांची उपलब्धता, गोदामांची संख्या, वीज जोडणी, विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून पीक पॅटर्न बदलाची तयारी, प्रधानमंत्री पीक विमा योजना, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, जलयुक्त शिवार अभियान, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, कृषी यांत्रिकीकरण व सिंचनाबाबत चर्चा करण्यात आली. नियोजनाप्रमाणे कृषी विभागातील कामे पूर्ण करण्यासाठी यंत्रणेने काटेकोपणे कामे करावी. शेतकºयांना पीक लागवड, बियाणे, खते यासंदर्भात अडचणी आल्यास तत्काळ दूर करण्यासाठी तत्पर राहावे, अशा सूचना पालकमंत्री मुनगंटीवार यांनी दिल्या.कृषी आणि वन विभागाने योजनांच्या अंमलबजावणीबाबत यावेळी सादरीकरण केले. त्यानंतर विभागनिहाय विविध योजनांवर चर्चा झाली. विभागप्रमुखांनी आपापल्या विभागाची माहिती बैठकीत सादर केले.१३ हजार ३१० मेट्रिक खत शिल्लकखरीप हंगामाकरिता ४ लक्ष ७५ हजार ५२२ हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये भातासाठी १ लक्ष ८० हजार १९६ हेक्टर, सोयाबीन ४९ हजार ७५० हेक्टर, कापूस १ लक्ष ९७ हजार २२७ हेक्टर, तूर ४३ हजार ६०५ हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात एकूण ६६ हजार १११.४० क्विंटल बियाण्याची आवश्यकता आहे. खरीप हंगामाकरिता १३ हजार ६०३ मेट्रिक टन खत प्राप्त झाले. आतापर्यंत २९३ मेट्रिक टन खताची विक्री झाली आहे. जिल्ह्यामध्ये १३ हजार ३१० मेट्रिक टन रासायनिक खत अद्याप शिल्लक आहे. जिल्ह्यातील शेतकºयांची संख्या लक्षात घेऊन वाढीव खताची मागणी करण्यात आली. सर्व शेतकऱ्यांना सहजपणे खत मिळावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.१६ भरारी पथकेकृषी विभागाने शेतकºयांना योग्य दर्जाच्या कृषी निविष्ठा वाजवी दरात उपलब्ध होण्याच्या दृष्टीने जिल्हास्तरावर एक व तालुका स्तरावर १५ असे एकूण १६ भरारी पथकांची स्थापना केली. ही पथके कारवाई करतील.तक्रार निवारण कक्षशेतकºयांनी बियाण्यांची गुणवत्ता, खताच्या उपलब्धतेबाबत भेसळ वा अन्य कोणत्याही समस्येसाठी जिल्हास्तरावर कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद या ठिकाणी तक्रार निवारण कक्ष स्थापण्यात येणार आहे. याशिवाय तालुका व पंचायत समितीमध्ये तक्रारीचे निराकरण करण्यासाठी तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. कक्षातून समस्यांचा निपटारा केला जाणार आहे. जिल्ह्यात आतापर्यंत चोरबीटीच्या १३ प्रकरणांमध्ये कारवाई झाली आहे.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार