शेतकरी आर्थिक लाभापासून वंचित
चंद्रपूर : शासनाने जाहीर केलेली अतिवृष्टी, तसेच पीक विमा मदत अद्यापही काही शेतकऱ्यांना मिळाली नसल्याने आर्थिक अडचणीला सामोर जावे लागत आहे. शेती हंगाम सुरु असल्यामुळे शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे. त्यामुळे त्वरित निधी देण्याची मागणी करण्यात आील आहे.
ऑटोचालकांच्या
समस्या सोडवा
चंद्रपूर : ऑटो चालकांना कामगार कायद्यानुसार कोणतीही सुरक्षा नाही. वाढत्या महागाईनुसार उत्पन्न मिळत नाही. कोरोनामुळे व्यवसायावर अनिष्ट परिणाम झाला. कोरोना काळामुळे ऑटोचालकांचे हाल होत आहे. त्यामुळे शासनाने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे.
एटीएमच्या स्वच्छतेकडे बँकेचे दुर्लक्ष
चंद्रपूर : येथील बहुतांश एटीएममध्ये अस्वच्छता पसरली आहे. त्यामुळे ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील तुकुम, गांधी चौक तसेच नागपूर रोडवरील नियमित ग्राहकांची गर्दी असते. मात्र नियमित स्वच्छता होत नसल्याने ग्राहकांचे म्हणणे आहे.