शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

स्वामित्वधन भरल्याशिवाय बिल अदा करू नये

By admin | Published: November 15, 2014 10:44 PM

जिल्ह्यातील सर्व शासकीय-निमशासकीय व खासगी संस्थेद्वारा कंत्राटदारामार्फत जी वेगवेगळी बांधकामे करण्यात येतात आणि ज्या बांधकामांना वापरण्यात आलेल्या गौण खनिजास स्वामित्वधन देण्यातून

जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : शासकीय-निमशासकीय कार्यालयांना पाठविले पत्रचंद्रपूर : जिल्ह्यातील सर्व शासकीय-निमशासकीय व खासगी संस्थेद्वारा कंत्राटदारामार्फत जी वेगवेगळी बांधकामे करण्यात येतात आणि ज्या बांधकामांना वापरण्यात आलेल्या गौण खनिजास स्वामित्वधन देण्यातून सूट नसेल अशा सर्व बांधकामाचे स्वामित्वधन भरणे गरजेचे आहे. बांधकामासंदर्भात कंत्राटदारांनी जिल्हाधिकारी यांचे स्वामित्वधन मोकळे केल्याचे प्रमाणपत्र संबंधित यंत्रणेस सादर करणे अनिवार्य केले नसल्यास तसे करण्याची कार्यवाही करावी व सदर प्रमाणपत्राशिवाय कंत्राटदारांना बिलाची अंतिम अदायगी करू नये, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिले. रोहयो कामासाठी वापरण्यात येणाऱ्या गौण खनिज स्वामित्वधनाची रक्कम संबंधित विभाग, जिल्हा खनिज निधीत जमा करतील. सदर बाब ही महसूल व वनविभाग मुंबई यांच्या १८ आॅक्टोबर २००१ चे शासन निर्णयात अंतर्भूत करण्यात आलेली आहे. तथापि सद्यस्थितीत याबाबत अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. आतापर्यंत झालेल्या कामांची माहिती आणि स्वामित्वधन याबाबत संबंधित विभाग प्रमुखांनी अहवाल सादर करावा. यापुढे १८ आॅक्टोबर २००१ च्या शासन निर्णयात स्वामित्वधन जमा करण्याबाबत अंतर्भूत करण्यात आलेल्या धोरणानुसार अंमलबजावणी करण्यात यावी.पर्यावरण अनुमती प्राप्त अथवा जिल्हा खाणकाम योजनेमध्ये अंतर्भूत असलेल्या सर्व्हे क्रमांकाच्या क्षेत्रातून परवाना न घेताच कंत्राटदाराने गौण खनिजाचे इतरत्र क्षेत्रातून उत्खनन करून संबंधित बांधकाम पूर्ण केलेल्या अवैध उत्खननाच्या प्रकरणात महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ अन्वये दंडात्मक कारवाई, गौण खनिजाचे बाजार मुल्याच्या किमान तीन पट दंड ठोठावणे, कंत्राटदाराविरूद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या कारवाईचे प्रस्ताव त्या त्या विभागाकडून संंबधित तहसीलदार अथवा जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात यावे, असेही जिल्हाधिकारी म्हैैसेकर यांनी स्पष्ट केले आहे.उपरोक्त निर्देश रेल्वेचे सर्व परिमंडळ, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना, जलसंपदा विभाग व अधिनस्त महामंडळे, सार्वजनिक बांधकाम विभाग व अधिनस्त महामंडळे, पुनर्वसन विभाग व शासनाचे इतर विभाग तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांना लागू असतील. (शहर प्रतिनिधी)