लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कंत्राटी पध्दतीने डॉक्टर्सची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे रिक्त पदांमुळे कोलमडलेली ग्रामीण भागातील आरोग्य सेवा आता पुन्हा प्रवाहात येणार आहे. चंद्रपूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी याबाबत मागणी केली होती. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासाठी पाठपुरावा केला. त्यानंतर सार्वजनिक आरोग्य विभागाने १३ जून रोजी याबाबतचा शासन निर्णय निर्गमित केला आहे.चंद्रपूर जिल्हयातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टर्सच्या अभावामुळे रुग्णसेवेवर विपरित परिणाम होत असल्यामुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी जिल्हयात कंत्राटी पध्दतीने डॉक्टर्सच्या नेमणुका करण्याबाबत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे मागणी केली होती. त्याअनुषंगाने पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने विशेष बाब या सदराखाली जिल्हयात ४० हजार रू. प्रतिमाह वेतनावर डॉक्टर्सची नियुक्ती कंत्राटी पध्दतीने करण्याबाबत मान्यता देण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीने थेट मुलाखती घेवून डॉक्टर्सची नियुक्ती करण्याचे धोरण ठरविण्यात आले आहे. परंतु ४० हजार रू. हे वेतन अत्यल्प असल्यामुळे डॉक्टर्सचा प्रतिसाद या नेमणुक प्रक्रियेला लाभला नाही. त्यामुळे आता अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने हे वेतन ७० हजार रू. करण्यात आले आहे. आता समिती मार्फत थेट मुलाखती घेवून प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टर्सच्या नियुक्त्या करण्याचा मार्ग मोकळा झाला असून ग्रामीण भागातील वैद्यकीय सेवा सुरळीत होण्यास मोलाची मदत होणार आहे.
आरोग्य केंद्रात कंत्राटी पद्धतीने डॉक्टरांची नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 11:48 PM
चंद्रपूर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कंत्राटी पध्दतीने डॉक्टर्सची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे रिक्त पदांमुळे कोलमडलेली ग्रामीण भागातील आरोग्य सेवा आता पुन्हा प्रवाहात येणार आहे. चंद्रपूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी याबाबत मागणी केली होती.
ठळक मुद्देग्रामीण आरोग्य सेवेला बळकटी : सुधीर मुनगंटीवार यांचा जिल्ह्यासाठी पुढाकार