शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
2
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
3
ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप
4
शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...
5
विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”
6
भाजपच्या मंत्र्यानं अजान ऐकून थांबवलं भाषण; मंचावरूनच पठण केलं, ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ 
7
Gautam Adani News : अदानी समूहावर आरोप म्हणजे भारताचा विकासरथ रोखण्याचं षडयंत्र; महेश जेठमलानी बचावासाठी मैदानात
8
२८ चेंडूत १०० धावा! IPL मधील Unsold गड्यानं फास्टर सेंच्युरीसह मोडला रिषभ पंतचा रेकॉर्ड
9
‘इस्कॉन कट्टरतावादी संघटना’, बांगलादेशमधील युनूस सरकारकडून बंदी घालण्याची तयारी  
10
"बाळा, मीच तुझी मम्मा..."; मेकअप केलेल्या आईला ओळखू शकला नाही लेक, ढसाढसा रडला
11
भाजपाने जे ठाकरेंसोबत केले, तसेच आता शिंदेंशी वागतायत का? शिंदे गटाचे नेते म्हणाले...
12
धक्कादायक! महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघात एका बूथवरील मतमोजणी झालीच नाही
13
एकनाथ शिंदे यांची दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद, मोठा निर्णय जाहीर करणार? 
14
लग्नाचं आमिष दाखवून केलं शोषण, 'पुष्पा 2'मधील अभिनेत्याविरोधात FIR दाखल
15
'बांगलादेशच्या स्वातंत्र्याला धोका...', चिन्मय दास यांच्या अटकेनंतर भारताची तीव्र प्रतिक्रिया; बांगलादेश म्हणाला...
16
मुख्यमंत्री कोण होणार? लवकरच उत्तर मिळेल; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य
17
काय आहे 'वन नेशन, वन सबस्क्रिप्शन' योजना, कोणाला होणार फायदा?
18
IPL Auction 2025: धडामsss ! मॅक्सवेल ते स्टार्क… ‘या’ ५ बड्या खेळाडूंचा भाव ‘धाडकन्’ कोसळला..!!
19
Enviro Infra Engineers IPO Allotment : एन्व्हायरो इन्फ्रा IPO चं अलॉटमेंट झालीये का? कसं चेक कराल, जाणून घ्या 
20
६ बहिणींचं लग्न, ४ भावांचं शिक्षण; अपघातात मृत्यू झालेल्या डॉक्टरची डोळे पाणावणारी गोष्ट

वयाच्या चाळीशीनंतर ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी लागणार डॉक्टरांचे प्रमाणपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 5:00 AM

वयाची चाळीशी ओलांडणाऱ्यांना एमबीबीएस डॉक्टरांकडून ऑफलाईन वैद्यकीय प्रमाणपत्र द्यावे लागत होते. आता लायसन्स काढण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने फेसलेस सेवा सुरू केली. यांतर्गत घरबसल्या लर्निंग लायसन्स काढणे सोयीचे झाले आहे. त्यामुळे चाळीशी ओलांडलेल्या व्यक्तिंना लायसन्स काढायचे असेल किंवा नूतनीकरण करायचे असेल तर डॉक्टरांचे वैद्यकीय प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने सादर करावे लागणार आहे.

परिमल डोहणेलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वयाची चाळीशी गाठलेल्यांना वाहन परवाना काढण्यासाठी एमबीबीएस डॉक्टरांचे वैद्यकीय प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. पूर्वी हे प्रमाणपत्र ऑफलाईन सादर करायचे होते. मात्र, आता ऑनलाईन सादर कारावे लागणार आहे. त्यामुळे आता वयाच्या चाळीशीनंतर शारीरिकदृष्ट्या सुदृढ असलेल्यांनाच ड्रायव्हिंग लायसन्स मिळणार आहे. वाहनचालक हा वैद्यकीय व शारीरिकदृष्ट्या सक्षम असेल तरच तो व्यवस्थित वाहन चालवू शकतो. त्यामुळे वयाची चाळीशी ओलांडणाऱ्यांना एमबीबीएस डॉक्टरांकडून ऑफलाईन वैद्यकीय प्रमाणपत्र द्यावे लागत होते. आता लायसन्स काढण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने फेसलेस सेवा सुरू केली. यांतर्गत घरबसल्या लर्निंग लायसन्स काढणे सोयीचे झाले आहे. त्यामुळे चाळीशी ओलांडलेल्या व्यक्तिंना लायसन्स काढायचे असेल किंवा नूतनीकरण करायचे असेल तर डॉक्टरांचे वैद्यकीय प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने सादर करावे लागणार आहे. त्यासाठी त्यांना युजरआयडी व पासवर्ड देण्यात येणार आहे. त्यानंतर ते प्रमाणपत्र अपलोड करता येणार आहे. त्यामुळे चाळीशीनंतर शारीरिकदृष्ट्या सुदृढ असलेल्यांनाच ड्रायव्हिंग लायसन्स काढता येणार आहे किंवा नूतनीकरण करता येणार आहे. 

लर्निंग लायसन्स ऑनलाईनवाहन परवान्यासाठी नागरिकांना प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अनेकदा फेऱ्या माराव्या लागतात. त्यातच दलालाकडून अतिरिक्त पैसे आकारले जात असल्याची ओरड नेहमीच होत असते. त्यामुळे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने फेसलेस सेवा सुरु केली. या सेवेतंर्गत चंद्रपूर जिल्ह्यात अडीच हजार ऑनलाईन लर्निंग लायसन्स काढण्यात आले आहे.

पूर्वीपासून चाळिशीनंतर परवाना काढायचा असल्यास वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक होते. परंतु, आता ते ऑनलाईन मागविण्यात येणार आहे. त्यासाठी लाॅगिन देण्यात येणार आहे. त्यानंतर अपलोड करावे लागणार आहे. ही प्रक्रीया अंडर प्रोसेस आहे.-किरण मोरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, चंद्रपूर

किती वयापर्यंत मिळते लायसन्स- वाहन चालवायचा परवाना घेण्यासाठी चालकांचे वय किमान १६ असणे गरजेचे आहे.- कोणत्याही वयापर्यंत चालकाला लायसन्स काढता येते किंवा नुतनीकरण करता येते. परंतु, वयाच्या चाळिशीनंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र गरजेचे असते. - अन्यथा लायसन्स काढताही येत नाही किंवा नुतनीकरण करता येत नाही.

एका डॉक्टरला दिवसाला २० प्रमाणपत्र देता येणारपूर्वी आयुर्वेदिक किंवा होमिओपॅथी डॉक्टरही हे प्रमाणपत्र द्यायचे. परंतु, यावर आक्षेप घेण्यात आल्यानंतर केवळ एमबीबीएस असलेल्या डॉक्टरांचेचे प्रमापत्र ग्राहृ्य धरले जाते. एक डॉक्टर दिवसांतून केवळ २० जणांना परवान्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र देण्याची मुभा दिली आहे. आता ऑनलाईनच प्रमाणपत्र अपलोड करावे लागणार आहे. 

 

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीस