शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
2
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
3
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
4
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
6
ISRO-SpaceX ची भागीदारी यशस्वी, Elon Musk यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट; आता प्लेनपासून गावापर्यंत मिळेल नेट!
7
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
9
पुतिन, झेलेन्स्कींनी मला भेटून तोडगा काढावा; तिसरे महायुद्ध टाळायलाच हवे -डोनाल्ड ट्रम्प
10
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
11
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
12
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
13
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन
14
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
15
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
16
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
17
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
18
निवडणूक निकालानंतर बेकायदा होर्डिंग्ज लावल्यास कारवाई करा; हायकोर्टाचे राज्य सरकार, पोलीस प्रमुखांना निर्देश
19
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
20
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो

दीड महिन्यापासून खूप सोसले आता लॉकडाऊन नकोच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2021 5:00 AM

कोरोना उद्रेकामुळे जिल्ह्यातील हजारो लोकांचे रोजगार बुडाले. व्यवसाय कोलमडले. अनेकांच्या उदरनिर्वाहाची साधने उद्ध्वस्त झाली. जुने व्यवसाय बंद करून दारोदारी भटकून जीवनाेपयोगी किरकोळ वस्तू विक्री करावी लागत आहे. यातून मिळणाऱ्या तुटपुंज्या मोबदल्यातून कुटुंबाच्या दैनंदिन गरजा भागविणे कठीण झाले. कोरोना कहर सुरू असल्याने प्रशासनाने निश्चित केलेल्या वेळात किती विक्री होईलच, याची खात्री नाही.

ठळक मुद्देसर्वसामान्यांची व्यथा : दोन आठवडे निर्बंध वाढविल्याने घालमेल

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्हिटी दर १० पेक्षा अधिक असल्याने जिल्हा प्रशासनाने १५ जून २०२१ च्या सकाळी ७ वाजतापर्यंत आधीचे सर्व निर्बंध कायम ठेवल्याचे सोमवारी जाहीर केले. मात्र या निर्णयामुळे लहान व्यावसायिक, कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांची पुन्हा घालमेल सुरू झाली. दीड महिन्यापासून खूप सोसले; आता लॉकडाऊनच नकोच, या शब्दात नाराजी व्यक्त करू लागले आहेत.कोरोना उद्रेकामुळे जिल्ह्यातील हजारो लोकांचे रोजगार बुडाले. व्यवसाय कोलमडले. अनेकांच्या उदरनिर्वाहाची साधने उद्ध्वस्त झाली. जुने व्यवसाय बंद करून दारोदारी भटकून जीवनाेपयोगी किरकोळ वस्तू विक्री करावी लागत आहे. यातून मिळणाऱ्या तुटपुंज्या मोबदल्यातून कुटुंबाच्या दैनंदिन गरजा भागविणे कठीण झाले. कोरोना कहर सुरू असल्याने प्रशासनाने निश्चित केलेल्या वेळात किती विक्री होईलच, याची खात्री नाही. त्यामुळे दीड महिन्यांपासून जिल्ह्यातील हजारो लघुव्यावसायिकांची प्रचंड आर्थिक ओढाताण सुरू आहे. या कालावधीत जिल्हा प्रशासनाने कोरोनाविरुद्ध प्रतिबंधात्मक उपाययोजना वाढविल्या. आरटीपीसीआर व अ‍ॅन्टिजन चाचण्यांची व्याप्ती वाढविली. त्यामुळे संसर्गाचा आलेख उतरणीला लागला. मृतांची संख्याही कमी होत आहे. पॉझिटिव्ही दर १० टक्क्यांपेक्षा खाली आणि ऑक्सिजनवरील रुग्णसंख्या कमी झालेल्या २० जिल्ह्यांतील निर्बंध शिथिल झाले. चंद्रपूर जिल्हा मात्र रेड झोनमध्ये आहे. त्यातच निर्बंधांना मुदतवाढ दिल्याने जगायचे कसे, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारू लागले आहेत. 

लघुव्यवसायांवर कुठाराघातnजिल्हा प्रशासनाने ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत लागू केलेल्या निर्बंधांचा पॉझ बटनासारखा वापर केला. त्याची उपयुक्तताही सिद्ध होऊ लागली. परंतु गोरगरीब, सर्वसामान्य नागरिक व लघुव्यवसायांवर या निर्बंधांचा प्रचंड आघात बसला आहे. त्यामुळे १५ जून २०२१ च्या सकाळी ७ वाजतापर्यंत आधीचे सर्व निर्बंध ‘जैसे थे’ ठेवल्याचे सोमवारी जाहीर होताच नागरिकांत नाराजी उमटत आहे.

हजारो कुटुंंबे आर्थिक तणावातnनिर्बंध लागू केल्यानंतर कामगार, हमाल, हॉकर्स आणि अन्य लघुव्यावसायिकांच्या अर्थार्जनाची जबाबदारी घेण्यास सरकार कमी पडले. कार्डधारकांना धान्याची व्यवस्था हा अपवाद वगळल्यास पार काही मिळाले नाही. उद्योगांना शिथिलता देण्यात आली. पण कच्चा माल ते व्रिकीपर्यंतची साखळी विस्कळीत झाली. रोजगाराचे मार्ग बंद असल्याने हजारो कुटुंंबांमध्ये मोठा आर्थिक ताणतणाव वाढला.

हाताला कामच नाही; बेरोजगार वैतागलेकोरोना संसर्गापासून सुशिक्षित बेरोजगारांचे तर हाल सुरू आहेत. कौशल्यावर आधारीत रोजगार आणि नोकर भरती ठप्प आहे. नोकरीला पात्र असलेले शिक्षण पूर्ण करूनही कुठे संधी नाही. उद्याचे बघू; पण आजचा खर्च कसा भागवायचा, असा विचार करू पाहणाऱ्या बेरोजगारांना जिल्ह्यात सद्यस्थितीत कुठेच रोजगार नाही. त्यामुळे दीड दोन महिन्यांपासून तेही वैतागले असून निर्बंधांबाबत नाराजी व्यक्त करीत आहेत.

शनिवारी होऊ शकतो अनलॉक ?काही जिल्ह्यांत लॉकाडऊन नियमांत बदल झाला. यासाठी पॉझिटिव्हिटी दर आणि ऑक्सिजन खाटांची उपलब्धता याचा विचार करण्यात आला. यापुढे २९ मे २०२१ च्या तारखेपासून येत्या शनिवार (दि. ५) पर्यंत जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी दर व ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता किती कमी होईल, यावरच निर्बंध उठणार की कायम राहणार असल्याचे समजते.

सर्वसामान्य नागरिक व व्यापाऱ्यांची स्थिती अत्यंत वाईट झाली. मात्र प्रशासनाच्या प्रत्येक निर्णयाला सहकार्य आतापर्यंत सहकार्य मिळाले. जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर जास्त असला तरी पार मोठा परक नाही. त्यामुळे निर्बंध शिथिल झाले असते तर अर्थचक्र सुरू होण्यास मदत मिळाली असती. याचा पूर्विचार व्हावा.-सदानंद खत्री, अध्यक्ष, चंद्रपूर जिल्हा व्यापारी महासंघ तथा उपाध्यक्ष चेंबर  ऑफ कॉमर्स, चंद्रपूर

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा व प्रशासन पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे. आरोग्य सुविधाही वाढल्या. ऑक्सिजन बेड्सची कमतरता नाही. निकषांप्रमाणे जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी दर थोडा अधिक आहे. त्यामुळे पुढील आदेशापर्यंत निर्बंध कायम राहतील. मात्र नागरिकांनी खबरदारी घेतल्यास पॉझिटिव्हीटी दर निश्चित कमी होऊ शकेल.-अजय गुल्हाने, जिल्हाधिकारी, चंद्रपूर

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या