लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. अवकाळी पावसाने कपाशीची बोंडे सडल्याने उत्पादनात घट झाली आहे तर दुसरीकडे सततच्या पावसाने कपाशीची प्रतवारी घसरल्याने बाजारभाव कमी अशी अवस्था जिल्ह्यातील शेतकऱ्यांची झाली आहे.यावर्षी पावसाचे आगमन लांबले आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले. दरवर्षी साधारणत: दसºयानंतर शेतकऱ्यांच्या घरी सोयाबीन व कापूस हे नगदी पीक येतात त्यामुळे शेतकºयांची दिवाळी आनंदात जाते. परंतु यावर्षी नेमका याच काळात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्याने सोयाबीन व कापूस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी घट होत असून नगदी पीक असलेल्या कापूस व सोयाबीन पिकांची प्रतवारी घसरल्याने आज बाजारात या मालाला अत्यल्प भाव मिळत आहे. सध्या शेतकरी शेतातील सोयाबीन व कापूस पीक काढत आहे. कापूस ओला झाल्याने आणि सततच्या धुक्याने तो काळा पडत आहे. सततच्या पावसाने कपाशीचे बोंडे काळी पडल्याने हलक्या प्रतवारीचा कापूस एकाचवेळी फुटल्याने शेतकऱ्यांचा वेचणीचा खर्चही वाढला आहे. त्यामुळे मजुरही मिळणे कठिण झाले आहे. सद्या सात ते आठ रुपये किलो याप्रमाणे कापसाची वेचणी सुरू आहे. यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्याने शेतकºयांनी कपाशीला दिलेली खते अती पावसामुळे वाहून गेली. त्यामुळे पाऊस जाताच कपाशीची झाडे पिवळी पडून वाळत आहे. त्यामुळे कपाशीची यावर्षी नापिकी होण्याची भिती शेतकºयांना सतावत आहे.ओल्या कापसाला व्यापाऱ्यांची नापसंतीउन्हात वेचणी करताना कापसाचे वजन हलके होते. मात्र यंदा कापूस फुटण्याच्या दिवसांपासून सतत एक महिना पाऊस झाल्याने ओला झालेला कापूस उन्हात वाळवून विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यातच ओला व खराब झालेल्या कापसाला व्यापाºयांकडून कमी भाव मिळत आहे. अवकाळी पावसाने गेल्या आठवडाभरापासून विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांची पावले आता शेती शिवाराकडे वळली आहेत. मात्र सर्वाधिक नुकसान झालेले कपाशीचे पीक पाहून शेतकरी हतबल होत आहे. अनेक शेतकऱ्यांनी कापूस वेचणी सुरू केली. मात्र कापूस ओला असल्याने व्यापारी खरेदी करीत नाहीत. हा कापूस उन्हात वाळवून देखील किरकोळ व्यापारी कवडीमोल भावाने त्याची खरेदी करीत आहेत. शासनाकडून पिकांना योग्य भाव द्यावा, नुकसान भरपाई त्वरित मिळावी. अन्यथा पीक काढणीसाठी आलेला खर्चही वसूल होणार नाही, अशी अवस्था आहे प्रत्येक शेतकऱ्यांची असल्याची व्यथा शेतकरी व्यक्त करीत आहेत.परतीच्या पावसाने हाती येणारे कपाशीचे पीक उद्ध्वस्त झाले आहे. त्यातच भाव सुद्धा कमी मिळत आहे. वन्यप्राण्यांचा उभ्या पिकात धुमाकूळ सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात पिकांची नासधूस होतआहे. यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे.- दीपक पिंपळकरशेतकरी, गोवरीशेतकऱ्यांनी कपाशी पिकांवर अतोनात खर्च केला आहे.परंतु अस्मानी आणि सुलतानी संकटांनी शेतकरी पार होरपळून गेला आहे. यावर्षी शेतकऱ्यांवर निसर्ग कोपल्याने मोठा तोटा सहन करावा लागणार आहे. आर्थिक मदत करणे गरजेचे आहे.- रामदास लांडेशेतकरी, कोलगाव
जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांपुढे दुहेरी संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 6:00 AM
यावर्षी पावसाचे आगमन लांबले आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले. दरवर्षी साधारणत: दसºयानंतर शेतकऱ्यांच्या घरी सोयाबीन व कापूस हे नगदी पीक येतात त्यामुळे शेतकºयांची दिवाळी आनंदात जाते. परंतु यावर्षी नेमका याच काळात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्याने सोयाबीन व कापूस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
ठळक मुद्देअर्थकारण बिघडले : शेतमालाची प्रतवारी घसरल्याने भावही झाले कमी