-------
बॉक्स
हुंडाप्रतिबंधक कायदा काय?
हुंडा प्रतिबंधक कायदा भारतात १९६१ साली पारित करण्यात आला. हुंडा म्हणजे लग्नात एका पक्षाकडून दुसऱ्या पक्षाला थेट अथवा अप्रत्यक्ष वस्तू, स्थावर जंगम मालमत्ता देणे अथवा कबूल करणे, हुंडा प्रतिबंधक कायद्यानुसार केवळ हुंडा मागणे हाच गुन्हा नाही तर हुंडा देणेही दखलपात्र गुन्हा आहे. त्यासाठी सात वर्षे ते आजन्म कारावासही होऊ शकतो.
बॉक्स
मुलामुलींच्या मनात काय?
सुखी आयुष्यासाठी पैसा नाही तर एकमेकांबद्दलचे प्रेम आणि मने जुळणे गरजेचे आहे. नात्यात विश्वास असेल तर संसार सुखाचा होत असतो. मुलीच्या कुटुंबाकडून हुंडा मिळत नाही म्हणून मुलीला नाकारत असल्याचे अनेक प्रकरणे वृतपत्रात वाचायला मिळतात. यावरून आपण खरचं सुशिक्षित झालो आहात का, असा प्रश्न नेहमीच पडत असतो.
-प्रशांत नक्षणे
-------
मुलगी आपले माहेरचे सर्व सोडून सासरी येते. असे असतानाही तिला सामावून घेण्याऐवजी तिच्या कुटुंबाकडे पैशांची किंवा हुंड्यांची मागणी केली जाते. अशा प्रकारातून अनेक मुलींचे आयुष्य बरबाद झाल्याचे वृत्तपत्रात वाचायला मिळते. कायदा करण्यात आला असून त्याची कठोर अंमलबजावणी होत नसल्याने असे प्रकार वाढत आहेत.
-संजना पद्मशेरीवार
----
मुला-मुलींच्या पालकांना काय वाटते
आताची पिढित सुशिक्षित आहे. त्यामुळे बहुतांश मुले-मुली स्वत:चा निर्णय स्वत:च घेताना दिसून येत आहे. काही अपवादात्मक ठिकाणी हुंड्याचे प्रकार दिसून येतात. युवकांनीच जर मनात आणले तर ही प्रथा सहज बंद करू शकतात. त्यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा.
-एकनाथ रायपुरे मुलाचे वडील
---
आता ऑनलाइन साइटवरून लग्न जुळण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे पूर्वीप्रमाणे बैठक घेऊन लग्न जुळविण्याचे प्रकार कमी झाले आहेत. दोघांचा विचार जुळले तर हुंडा घेण्याची काही गरज नाही. परंतु, रुढीमध्ये अडकलेले लोक प्रथेच्या नावाखाली हुंडा घेताना दिसून येतात.
प्रकाश घाटगे मुलीचे वडील
-----
जिल्ह्यात हुंड्यासाठी छळाच्या तक्रारी
२०१९ ११२
२०२० १३०
२०२१ ७०