फोटो
चंद्रपूर : स्थानिक डॉ. आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. मार्गदर्शक म्हणून योग गुरू नरेंद्र भवरे, योगशिक्षिका ज्योती आस्कर उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश दहेगावकर यांनी योग व प्राणायाम यांचे महत्त्व विषद केले, तर योगगुरुंनी प्रात्यक्षिक करून दाखविले. संचालन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. मिलिंद भगत, तर आभार सहकार्य अधिकारी डॉ. नितीन घुगरे यांनी मानले.
फोटो
राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय, सावली
सावली : राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय सावली येथे राष्ट्रीय सेवा योजना व शारीरिक शिक्षण विभागाच्या वतीने योग दिनाचा कार्यक्रम पार पडला. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. चंद्रमौली, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून पतंजली योग समिती मूलचे सुरेश खियानी, विद्या बोभाटे, भावना चौखंडे, रोशन तिवाडे आदी उपस्थित होते. यावेळी सुरेश खियानी यांनी योग प्रात्यक्षिक करून दाखवले. निरामय जीवनासाठी योग महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. संचालन डॉ. दिलीप कामडी तर आभार डॉ. भास्कर सुकारे यांनी मानले. यशस्वीतेसाठी डॉ. रामचंद्र वासेकर, प्रा. संदीप देशमुख यांनी प्रयत्न केले.