या ठिकाणी जवळपास १७ वेगवेगळ्या खासगी कंपनी मालकांची वाहने असून चालक कामगारांना वेजेसनुसार पगार दिला जात नाही, अशी तक्रार वाहन चालक कामगारांची आहे. त्यांना इतर सुविधांपासूनही वंचित ठेवल्या जाते, असे त्यांचे मत आहे.
वेळेवर त्यांना पगार देण्यात यावा, तसेच पीएफ अकाउंटवर पैसे जमा करण्यात यावे या व इतर अन्य मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही, तोपर्यंत काम बंद राहील , असा निर्धार चालक कामगार संघटनेने केला आहे.
या संदर्भात सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्यांनी निवेदन देऊन न्याय देण्याची मागणी केली आहे. दरम्यान काही खासगी वाहन मालक शुक्रवारी चालक कामगारांसोबत बैठक घेऊन समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला मात्र यात खाजगी वाहन कंपनी मालकांना यश आले नाही. चालक संघटनेचे सदस्य प्रदीप सोयाम यांनी सांगितले की आम्ही सर्व स्थानिक भागातील असून आम्हाला काम मिळाले. मात्र नियमानुसार पगार व हक्काच्या सोयीसुविधा पुरविण्यात याव्या, ही मागणी सर्व कामगार संघटनेची आहे.