भेजगाव : मूल तालुक्यातील भेजगाव येथील शेतकरी परशुराम कवडू लेनगुरे (६१) हा शुक्रवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास शेताला लागून असलेल्या उमा नदीपात्रात बैल धुण्यासाठी गेला होता. मात्र कित्येक तास होऊनही तो बाहेर न आल्याने कुटुंबीयानी त्याची शोधाशोध सुरू केली. मात्र तो कुठेही आढळला नाही.
दरम्यान परशुरामला खोल पाण्याचा अंदाज आला नसल्याने तो पाण्यात बुडाला असावा, असा अंदाज वर्तविण्यात येत होता तर प्रत्यक्षदर्शीनुसार तो बुडाल्याचे सांगण्यात येत होते. शुक्रवारी संध्याकाळपर्यंत स्थानिक भोई बांधव व चंद्रपूरच्या रेस्क्यू टीमने शोधाशोध केली असता परशुराम मिळाला नाही. मात्र २४ तास उलटल्यानंतर शनिवारी दुपारच्या सुमारास पोंभूर्णा तालुक्यातील चक बल्लारपूर येथील अंधारी नदीपात्रात मोटरपंपाला लटकलेल्या स्थितीत त्यांचा मृतदेह आढळला.
लगेच त्यांनी फोन करून पोलिसांना माहिती दिली. पोंभूर्णा पोलिसांनी मूल ठाण्याशी संपर्क साधून मृतदेहाची माहिती दिली. मूल पोलिसांनी नातेवाईकांसोबत घटनास्थळ गाठून मृतदेहाची ओळख पटविली. परशुराम यांचाच मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले. पुढील तपास पोलीस निरीक्षक सतीश सिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनात पो.ह. कोसनशीले, मुरमुरे करीत आहेत.
250921\img_20210925_162404.jpg
नदीपात्रात बुडालेला शेतकरी परशुराम कवडू लेनगुरे