आॅनलाईन लोकमतकोरपना : तालुक्यातील नांदाफाटा येथील रहिवाशी व किसान कल्याण समितीचे अध्यक्ष पवनदीप यादव याच्या भुरकुंडा येथील शेतात पोलिसांनी धाड टाकून ३ लाख ३६ हजार ५०० रुपयांच्या दारूसाठ्यासह मुद्देमाल जप्त केला. होळीच्या दिवशी ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांनी केल्याने या कारवाईमुळे दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.आरोपी पवनदीप यादव हा अनेक दिवसांपासून दारूचा व्यवसाय करीत होता. मात्र पोलिसांना सुगावा नव्हता. मात्र, पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पोलीस कर्मचाºयांनी पवनदीप यादव याच्या भुरकुंडा शेतशिवारात धाड मारली. शेतमालक यादव व त्याचा सहकारी सुरज बदखल या दोघांनी शेतातील घरात दारूसाठा लपवून ठेवला होता. आरोपींना पोलिसांचे वाहन दिसताच तेथून पळ काढला. मात्र यादव याचा नोकर व्यंकट पापय्या ओरगंटी (४५) पोलिसांच्या हाती लागला. लगेच पोलिसांनी सुरज बदखल यालाही ताब्यात घेतले व शेतातील घरातून हरियाना राज्य बनावटीच्या १०५ दारूच्या बाटल व ९६ देशी दारूच्या बॉटल असा एकूण ३ लाख ३६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मुख्य आरोपी शेतमालक पवनदीप यादव हा फरार असून पोलीस त्याच्या मागावर आहेत. पवनदीप यादव हा नांदाफाटा येथे दुध संकलन करणाºया मदर डेअरीचा संचालक असून मोठा दुध व्यावसायिक आहे. राजुरा येथेही त्याने दुध संकलन केंद्र सुरु केले आहे.तो मुळचा हरियाना राज्यातील रहिवाशी असून गायी आणणाºया वाहनामधून त्याने हरियाना बनावटीच्या दारूची तस्करी केली असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. अनेक दिवसांपासून दारूचा ठोक पुरवठादार म्हणून तो अवैध व्यवसाय करीत असल्याचे निष्पन्न झाले असून नांदाफाटा येथेही दारूची तस्करी करीत होता. राजुरा पोलीस फरार मुख्य आरोपी पवनदीप यादवच्या शोधात आहेत.
दारूविक्रीत अडकला दुध विक्रेता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2018 11:39 PM
तालुक्यातील नांदाफाटा येथील रहिवाशी व किसान कल्याण समितीचे अध्यक्ष पवनदीप यादव याच्या भुरकुंडा येथील शेतात पोलिसांनी धाड टाकून ३ लाख ३६ हजार ५०० रुपयांच्या दारूसाठ्यासह मुद्देमाल जप्त केला.
ठळक मुद्देआरोपी फरार : साडेतीन लाखांचा दारूसाठा जप्त