तळोधी (बा) : दारूबंदीला चंद्रपूर जिल्ह्याला दोन वर्षे पूर्ण झालेले आहेत. मात्र तळोधी (बां.) व परिसरात अवैध दारू विक्रेत्याकडून खुलेआमपणे मोठ्या प्रमाणात दारू विक्री होत असल्यामुळे या परिसरात दारूचा महापूर वाहत आहे. त्यामुळे खाकी वर्दीचा धाक कमी झाला काय, असा प्रश्न नागरिक करीत आहेत. या ठिकाणी सहा ते सात दारूविक्रेते असून खुलेआमपणे चारचाकी वाहनांमधून पोलीस ठाण्याच्या समोरून दारूची आयात करतात. मात्र पोलीस पाहून न पाहल्यासारखे करीत आहेत. त्यामुळे पोलिसांचे अवैध दारू विक्रेत्यांसोबत मधूर संबंध असल्याची गावकऱ्यांत चर्चा आहे. पोलीस कारवाई करत नसल्यामुळे कायदा-सुव्यवस्था प्रश्न निर्माण होत आहे. तळोधी(बा) पोलीस ठाण्यात नवनियुक्त ठाणेदार म्हणून श्रीकांत पांढरे यांची नियुक्ती झाली. मात्र त्यांना अवैध दारू विक्रेत्यावर निर्बंध घालण्यात यश आल्याचे कुठेही दसून येत नाही. तळोधी(बा) व परिसरातील प्रत्येक गावात शासनाच्या सिंचन विहिरी प्रमाणे मागेल त्याला शेततळे, सिंचन विहिर ही योजना सुरू आहे. याचप्रमाणे तळोधी(बा) व परिसरात मागेल त्याला दारू असाही प्रकार दिसून येतो. (वार्ताहर)
तळोधी (बा) परिसरात दारूचा महापूर
By admin | Published: April 20, 2017 1:32 AM