लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : यावर्षी कापूस पिकावर मोठ्या प्रमाणात बोंडअळीचा प्रार्दुभाव झाला. त्यामुळे कापसाचे उत्पादन फार कमी झाले. त्यानंतरही कापसावरील संकट थांबता थांबत नसून सरकीमधून निघणाऱ्या तेलातही बोंड अळीने शिरकाव केला आहे. परिणामी तेलाचे उत्पन्न कमी होवून ढेपही निकृष्ठ दर्जाची झाली आहे. आता जिनिंगमध्ये काम करणाऱ्या कामगारांना रोगट कापसामुळे खाज सुटू लागल्याने मजुर त्रस्त आहेत. त्यामुळे अनेक जिनिंग मजुरांअभावी बंद ठेवाव्या लागत असल्याने जिनिंग संचालकासमोर नवीन संकट उभे ठाकले आहे.वरोरा परिसर हा मुख्य कापसाची बाजारपेठ म्हणून ओळखल्या जातो. वरोरा परिसरात चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात कापूस विक्रीस आणत असल्याने अनेकांनी जिनिंग व्यवसाय सुरू केला. गतवर्षी कपाशीच्या पेºयात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. मात्र कापूस पिकावर बोंड अळीने आक्रमण केल्याने अनेकांना उत्पन्न कमी झाले.कापसाचे दर वाढेल या आशेने अनेक शेतकऱ्यांनी कापूस घरात भरुन ठेवला. मात्र बोंडअळीग्रस्त कापूस घरात असल्याने कुटुंबियास त्वचा रोगाने ग्रासले आहे. मात्र उन्हाळा सुरू झाल्याने कापसाच्या वजनात घट होईल, या भीतीने अनेक शेतकरी सध्या मिळत असलेल्या दरात कापूस विकायला सुरूवात केली आहे. परिणामी जिनिंगमध्ये मोठ्या प्रमाणात कापसाची आवक वाढली आहे.कापसाची उचल करून जिनिंग करण्याच्या कामात शेकडो मजूर रात्रंदिवस काम करीत आहेत. मात्र या मजुरांना त्वचा रोगाने ग्रासल्याने मजूर घाबरून आहेत. त्यांना वैद्यकीय उपचार करण्याकरिता वेळ व पैसाही लागत असल्याने अनेक मजूर जिनिंगमध्ये काम करण्यास नकार देत आहे. परिणामी जिनिंगमध्ये मोठ्या प्रमाणात कापूस पडून आहे.
रोगट कापसामुळे चंद्रपूर जिल्ह्यात मजुरांना त्वचा रोगाने ग्रासले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2018 2:07 PM
जिनिंगमध्ये काम करणाऱ्या कामगारांना रोगट कापसामुळे खाज सुटू लागल्याने मजुर त्रस्त आहेत. त्यामुळे अनेक जिनिंग मजुरांअभावी बंद ठेवाव्या लागत असल्याने जिनिंग संचालकासमोर नवीन संकट उभे ठाकले आहे.
ठळक मुद्देकाम करण्यास मजुरांचा नकारजिनिंग संचालकांसमोर नवे संकट