चंद्रपूर : मागील वर्षीच्या अतिवृष्टीने कोलमडून पडलेला बळीराजा यंदा पुन्हा एकदा डोळ्यात हिरवं स्वप्न घेऊन जमीन कसण्यासाठी उभा झाला. मात्रं निसर्गाने यंदाही तांडवच केले. हंगामाच्या सुरूवातीला पावसानं दडी मारली. दुबार, तिबार आणि कुठे चारवेळा पेरणी झाली. पावसाने वेळापत्रक पाळले नाही. त्यामुळे खरीप हंगामात अपेक्षित उत्पन्न झाले नाही. त्यातूनही कसेबसे सावरत शेतकऱ्यांनी रबी हंगामाला सुरूवात केली. मात्र आता अवकाळी पावसाने रबी हंगामही खुडून नेला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. जिल्ह्यातील काही भागात शेतकऱ्यांनी सोयाबिन आणि कापसाचे उत्पन्न घेतले तर धानपट्टयात परंपरागत धानाची लागवड करण्यात आली. मात्र संकटांनी शेतकऱ्यांचा पिच्छा सोडला नाही. यंदाच्या हंगामात सुरूवातीपासूनच निसर्गाने फटकेबाजी केली. जून महिन्याच्या सुरूवातीला पावसाची अपेक्षा ठेऊन शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र पावसाने ऐनवेळी दांडी मारल्याने पेरण्या वाया गेल्या. हंगाम संपेस्तोवर निसर्गाने असाच घोळ केला. त्यामुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या उत्पादनात प्रचंड घट झाली. शेतकऱ्यांनी बँका आणि खासगी सावकारांकडून कर्ज काढून ते पैसे शेतीत लावले. मात्र श्रम आणि पैसा वाया गेला. हे सारे नुकसान सोसत शेतकरी रबी हंगामाच्या तयारीला लागले. खरीप हंगामातील कापूस शेतातच होता. धान कापणी करून शेतकऱ्यांनी शेतातच पुंजणे रचले होते. अचानक वातावरण बदलले. मागील आठवड्यात सतत चार दिवस जिल्ह्यात कुठे ना कुठे पाऊस झाला. शेतातील कापूस मातीमोल झाला. शेतकऱ्यांचे धान भिजले. त्यामुळे लाखो शेतकऱ्यांचे रुपयांचे नुकसान झाले. विरूर परिसरात हजारो हेक्टर पिकांना फटकाविरूर (स्टे.) : शेतपिकांची उत्पादन टक्केवारी त्यातून जमा खर्चाचे गणित मांडत असतानाच निसर्गाने घात केला आणि मागील तीन दिवसांत झालेल्या पावसाने नऊ महिन्याच्या कष्टावर पाणी फेरले. अवकाळी पावसामुळे विरूर परिसरातील हजारो हेक्टरवरील रबी पिकांची हानी झाली आहे. तसेच खरीप पिकातील कापूस पिकालाही अकाली पावसाचा फटका बसला आहे. परिसरातील हजारो हेक्टरवरील शेतपिकांचे नुकसान झाले. आता पिकांची कापणी, मळणी सुरू होते. काही पिके शेतात उभी होती. त्यांना घरी आणणे तेवढे शिल्लक होते. अशा अंतिम टप्प्यात पीक असतानाच निसर्गाने शेतकऱ्यांचा घास हिरावून घेतला. पावसाळ्यात पुराने सोयाबीन पीक वाहुन गेले. बँकांचे कर्ज, मुलींचे लग्न मुलांचे शिक्षण याचे वार्षिक नियोजन पार कोलमडून गेले आहे. परिसरात विरूर सह सुब्बई, डोंगरगाव, चिंचोली अन्नुर, अंतरगाव, चिंचाळा, भेंडाळा, खांबाळा, धानोरा, कविटपेठ आदी गावातील हजारो हेक्टरवरील पिकांची नासाडी झाली आहे.शेकडो हेक्टरमधील कापूस जमिनीवरगडचांदूर : अवकाळी पावसाचा कोरपना तालुक्याला चांगलाच फटका बसला असून शेकडो हेक्टरमधील कापूस जमिनीवर पडला आहे. त्यामुळे आधीच दुष्काळामुळे हैराण असलेल्या शेतकऱ्यांना निसर्गाने पुन्हा एकदा मोठा धक्का दिला आहे. कोरपना तालुक्यात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेण्यात येते. खरीप हंगामातील कापूस अद्यापही शेतात असताना व तो वेचणीवर आला असताना अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. एकीकडे कापसाला भाव नाही. खासगी व्यापारी देईल तो भाव घेऊन शेतकऱ्यांना कापूस विकावा लागत आहे. शेतातील अर्धा कापूस घरात तर अर्धा शेतात, अशा परिस्थितीत कोरपना तालुक्यात अवकाळी पावसाने थैमान घातले. सततच्या पावसामुळे झाडावरील कापूस खाली पडल्याने शेतकऱ्यांना चांगलाच धक्का बसला.वेचणीच्या वेळीच अवकाळी पावसाचा फटकाराजुरा : नापिकीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असताना अवकाळी पावसाने घात केल्यामुळे राजुरा तालुक्यात कापसाचे मोठ्या प्रमामात नुकसान झाले आहे. झाडावर बोंड फुटुन कापूस वेचणीसाठी तयार असताना अचानक वादळी पाऊस कोसळला. परिणामी कापूस जमिनीवर पडून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाली आहे. यावर्षी पावसाने वेळोवेळी दगा दिला. वेळेवर पाऊस न पडल्यामुळे लावलेले बियाणे वाया गेले. त्यानंतर अल्पसा पाऊस पडला. त्यामुळे झाडाची वाढ खुंटली. उत्पादनात घट झाली.आता अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने कापूस मातीमोल झाला. परिणामी शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. शासनाने कापूस खरेदी केंद्र सुरू केले नाही. त्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांनी पडत्या दरात कापूस खरेदी करून शेतकऱ्यांची पिळवणूक सुरू केली आहे. कापूस वेचणीचा शेवटचा टप्पा असतानाच पावसाने घात केला. अशा बिकट स्तितीत शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. शासनाने यापूर्वी शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचे आश्वासन देवून पीक पाहणी केली. त्याचा अहवाल शासन दरबारी पाठविण्यात आला.परंतु अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही.भद्रावती तालुक्यातील कापूस उत्पादक हतबलतालुक्यातील शेतकऱ्यांची नैसर्गिक संकट पाठ सोडायला तयार नाही. खरीप हंगामात पावसाने दगा दिला. त्यातून कसा बसा सावरत असताना अकाली पावसानी पुन्हा शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केले. तालुक्यात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते.यंदा पेरणीला उशिर, वेचणीला मजूर मिळत नाही, कसा बसा कापूस निघाला तर व्यापारपेठेत भाव नाही, अशा संकटात शेतकरी असताना अवकाळी पावसाने शेतकऱ्यां मोडून टाकले. तालुक्यातील ३९ हजार हेक्टर जमीन शेतीखाली आहे. त्यात धानाची शेती सहा हजार हेक्टर, सोयाबीन १२ हजार हेक्टर, कापूस १५ हजार हेक्टर तर उर्वरित शेतीमध्ये धान पिकाची लागवड करण्यात येते.
अवकाळी पावसाने बळीराजा उदध्वस्त
By admin | Published: January 06, 2015 10:59 PM