शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
2
सपाला मतदान करण्यास विरोध केला म्हणून तरुणीची हत्या; मैनपुरी हादरली, बलात्काराचाही संशय
3
PM नरेंद्र मोदींचा जगात डंका; आता गयाना आणि बार्बाडोसकडून 'सर्वोच्च सन्मान' जाहीर!
4
अमेरिकेसारख्या देशांना कर्जावर नियंत्रण ठेवावं लागेल, आणीबाणीसारख्या परिस्थितीत.., रघुराम राजन यांचा इशारा
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "तुझा मर्डर फिक्स", सुहास कांदेंची समीर भुजबळांना जीवे मारण्याची धमकी; दोन्ही गटात जोरदार वादावादी
6
Maharashtra Vidhan Sabha 2024: 1962 ते 2019... प्रत्येक निवडणुकीत अपक्षांनी किती मते खाल्ली?
7
कश्मिरा शाहची अपघातानंतर दिसली पहिली झलक, लांबलचक पोस्ट शेअर करत म्हणाली...
8
'धारावी प्रोजेक्ट'मध्ये अदानींना इंटरेस्टच नव्हता; शरद पवारांनी विषयच निकाली काढला
9
"मी यावेळी मतदान करु शकणार नाही...", मराठमोळ्या अभिनेत्रीची सोशल मीडियावर पोस्ट
10
Lawrence Bishnoi : "लॉरेन्स बिश्नोई रोज सकाळी १०८ वेळा..."; वकिलाने सांगितल्या गँगस्टरच्या काही खास गोष्टी
11
"पक्षापेक्षा जास्त उमेदवाराचा विचार!" मनवा नाईकने केलं मतदान, म्हणाली, "स्थिर सरकार..."
12
तुम्हाला माहितीये का, भारतात रस्त्यावर धावणाऱ्या सर्वाधिक ई-बसेस कोणत्या कंपनीच्या?
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : निवडणुकीदिवशीच सोलापुरात ठाकरे गटाला धक्का! सुशीलकुमार शिंदेंचा अपक्ष उमेदवाराला पाठिंबा
14
६ महिन्यांत 'या' शेअरमध्ये ५६५% ची वाढ; आता बोनस शेअर देण्याची तयारी, कोणता आहे स्टॉक?
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार
16
Vidhan Sabha 2024: महिला उमेदवारांचे त्रिशतक; आतापर्यंतचा उच्चांक!  
17
RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल; रिझर्व्ह बँकेनं नागरिकांना केलं सावध, म्हणाले...
18
शिंदेंच्या शिवसेनेकडून बनावट पत्र, राज ठाकरे संतापले; "वरळीकर मतदार सूज्ञ..." 
19
चंदा कोचर यांच्याविरोधात कारवाई करू नका, उच्च न्यायालयाचे एसएफआयओला निर्देश 
20
"१०:३० वाजता मतदानाला गेले, फक्त तीनच लोक", रस्त्यांची दुरवस्था दाखवत बॉलिवूड अभिनेत्री म्हणते- "जर तुम्हाला..."

कापूस खरेदीअभावी जिनिंग पडल्या ओस

By admin | Published: November 23, 2015 12:58 AM

जिल्ह्यातील कापूस व कृषी शेतमालाची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या कोरपना येथे सीसीआय, पणन महासंघ किंवा खासगी पैकी एकाचीही कापूस खरेदी सुरू झालेली नाही.

प्रशासनाचे दुर्लक्ष : कोरपन्यातील कापसाची परजिल्ह्यात विक्रीजयंत जेनेकर कान्हाळगावजिल्ह्यातील कापूस व कृषी शेतमालाची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या कोरपना येथे सीसीआय, पणन महासंघ किंवा खासगी पैकी एकाचीही कापूस खरेदी सुरू झालेली नाही. परिणामी तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध नाही. त्यामुळे येथील कापूस उत्पादकांना आपला कापूस कवडीमोल भावात खेडा खरेदीदारांना विकावा लागत आहे.तालुक्यातील शेती ही पांढऱ्या सोन्यासाठी सर्व दूर परिचित आहे. परंतु, यंदा झालेल्या अकाली पावसाने कापूस उत्पादकांना जबर तडाखा बसला. कसे-बसे सावरुन त्याने दुबार पेरणी केली. मात्र तो आर्थिकदृष्ट्या खंगला गेला आहे. यातच आता कोरपन्याचे कापूस संकलन केंद्रही सुरू न झाल्याने दूर अंतरावर असलेल्या वणी, राजुरा, आसिफाबाद येथील बाजारपेठेत कापूस विकण्यासाठी न्यावा लागत आहे. यामध्ये आधीच कापसाला असलेला अल्पभाव व मालवाहक खर्च शेतकऱ्यांच्या दृष्टीने न पेलवणारा आहे. १० दिवसांपूर्वी पणन महासंघातर्फे कोरपन्यात कापूस खरेदी करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात अद्यापही खरेदीला सुरुवात झाली नाही. त्यामुळे येथील जिनिंग ओस पडल्या आहेत. आजघडीला शहरात एक सहकारी व दोन खासगी जिनिंग आहे. परंतु, अर्धा हंगाम जाऊनही खरेदीला सुरुवात झाली नाही. त्यामुळे खरेदी सुरू होईल की नाही, याबाबत आजही साशंकताच आहे. शेजारच्या राजूरा तालुक्यात उत्पादन कमी असूनही सीसीआयतर्फे खरेदी सुरू करण्यात आली आहे. मात्र या ठिकाणी विक्रमी उत्पादन असतानाही प्रशासनाच्या वतीने बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात आली नाही. यात कापसाचाही भाव कमी-जास्त होत असल्याने खेडा खरेदीदारांना चांगलेच सुगीचे दिवस शेतकऱ्यांच्या विवंचनेपोटी आले आहे. अनेक शेतकरी पणन मार्फत कापूस विक्रीला अनउस्तुक आहे. तालुक्यात मागील वर्षी सीसीआयतर्फे कापूस खरेदी करण्यात आली होती. यात ५० हजारापर्यंत विक्रमी कापूस खरेदी करण्यात आला. मात्र यंदा खरेदी न करण्यामागे कोणते कारण आहे, हे न उलगडणारे कोडे आहे. सद्यस्थितीत या भागातील शेतात कापसाला मोठा बहार आला आहे. परंतु, मजुरांची संख्या अत्यल्प असल्याने कापसाचे रान तयार झाले आहे. यातही हवामानाच्या बदलत्या अंदाजाने शेतकरी चिंतेत अडकला आहे. आज कधी नव्हे एवढे मजूर इतरत्र ठिकाणावरुन कोरपन्यात दाखल झाले आहे. यात मराठवाडा, उमरखेड, हिमायतनगर, सावली, सिंदेवाही, तेलंगणातील बेला, जैनत, मूल, पोंभूर्णा, जीवती, गोंडपिपरी, नागभीड भागातील मजुरांचा समावेश आहे. मात्र हेही मजूर आजघडीला कमी पडत आहे. यामध्येही वेचणीचे वाढलेले भाव शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या तंगवणारे ठरत आहे. जिल्ह्यात राजुरा, वरोरा, माढेळी येथे कापूस खरेदीला सुरुवात झाली आहे. कोरपण्यात असलेल्या अवकाशामुळे शेतकरी खरेदीला सुरुवात केव्हा होईल, अशा चर्चा सुरू आहेत. याबाबत स्थानिक बाजार समितीच्या वतीने वरिष्ठांना अनेकदा पत्रव्यवहार करण्यात आले. परंतु, खरेदीला सुरुवात झाली नाही. त्यामुळे आठवड्यात खरेदीला सुरुवात न झाल्यास आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.