शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'फडणवीसांनीच आरोप केले, त्यांनीच फाईल दाखविली'; सुप्रिया सुळे म्हणाल्या, आर. आर. पाटलांच्या कुटुंबाची माफी मागितली...
2
दौरे ठरले! मल्लिकार्जून खर्गे अन् राहुल गांधी महाराष्ट्रात येणार; नागपूर, मुंबईत सभा होणार
3
भाजपचा विरोध, पण दादांनी..."; नवाब मलिकांनी सांगितलं काय घडलं राजकारण
4
भुजबळांच्या 'त्या' विधानावर राज ठाकरेंचा खोचक सल्ला, म्हणाले- "त्यांनी एक पक्ष काढावा आमचा...!"
5
"महाराष्ट्राच्या प्रगतीचा भाजपा आणि महायुतीचा दावा फसवा आणि खोटा’’, नाना पटोले यांची टीका  
6
भाजपाचा प्रचारसभांचा धडाका! PM मोदी ८, अमित शाह १५ सभा घेणार; योगी आदित्यनाथांच्या किती?
7
“मनसे सत्तेत येईल, आमच्या पाठिंब्यावर भाजपाचा मुख्यमंत्री होईल”; राज ठाकरेंचे स्पष्ट संकेत
8
... अशाने महाराष्ट्र कंगाल होईल; लाडकी बहीण योजनेवरून राज ठाकरेंचा घणाघात
9
रितेश देशमुखचा अमित व धीरज यांना पाठिंबा, विधानसभा निवडणुकीसाठी दिल्या खास शुभेच्छा!
10
मागच्या ५ वर्षांत महाराष्ट्रातील राजकारणात झालेल्या चिखलाला जबाबदार कोण? राज ठाकरेंनी दोन शब्दात दिलं उत्तर
11
सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड मदरशांवर मोठा निर्णय देणार; CJI च्या यादीत 'ही' महत्त्वाची प्रकरणे
12
उद्धव ठाकरे की शरद पवार? महायुतीची द्वारे कोणाला खुली होणार? देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान
13
बुमराहनं गमावला 'नंबर वन'चा मुकूट; टेस्टमध्ये त्याच्यापेक्षा बेस्ट ठरला 'हा' गोलंदाज
14
Diwali 2024: इकडे कन्फ्युजनमध्ये राहाल, तिकडे शेअर बाजार चालूच राहिल.., पैसा जाईल; ३१ ऑक्टोबरचं काय?
15
राज ठाकरेंनी आपल्या मुलासाठी माहिम मतदारसंघच का निवडला? काय आहे तयारी? स्वतःच सांगितलं
16
सोलापुरात सर्वच प्रमुख पक्षांना बंडखोरीचं ग्रहण; कोणत्या मतदारसंघात कोण लढणार?
17
माहिम मतदारसंघात अमित ठाकरेंना भाजपाचा पाठिंबा?; देवेंद्र फडणवीसांची स्पष्ट भूमिका
18
Maharashtra Election 2024: 'कशाला कोर्टात गेली?'; अजित पवार सुळेंवर भडकले; शरद पवारांनाही केला सवाल
19
मारुती सुझुकी स्वत:साठीच नाही तर दुसऱ्या कंपनीलाही इलेक्ट्रिक कार बनवून देणार; केव्हा करणार लाँच
20
Salman Khan : सलमान खानला ६ वर्षांत १२ पेक्षा जास्त वेळा जीवे मारण्याच्या धमक्या; कोणी केलेला फोन?

शुल्क न भरल्याने सराव परीक्षेपासून वंचित

By admin | Published: February 08, 2017 2:01 AM

पहाडावरील गोरगरीबांच्या मुलांना इंग्लीश मिडीयमचे धडे गिरविता यावे, त्यांना इंग्रजी वाचता व लिहिता

जिवती येथील इंग्लीश मिडीयम स्कूलमधील प्रकार : ट्युशन फीच्या नावावर पालकांची लूट शंकर चव्हाण   जिवती पहाडावरील गोरगरीबांच्या मुलांना इंग्लीश मिडीयमचे धडे गिरविता यावे, त्यांना इंग्रजी वाचता व लिहिता आणि बोलता यावी यासाठी जिवती येथे मिशनरी (ख्रिच्छन) अंतर्गत संथ थॉमस इंग्लीश मिडियम स्कूल चालू करण्यात आले. मात्र येथील संस्थाचालक व व्यवस्थापकाच्या मनमानी कारभारामुळे शाळेचे शिकवणी शुल्क व स्कूल बस शुल्क वेळेवर भरले नाही म्हणून १६ ते १७ विद्यार्थ्यांचा चक्क वर्गाबाहेर काढून सराव परीक्षेपासून वंचित ठेवण्यात आल्याचा प्रकार ६ फेब्रुवारी रोजी या मिशनरी शाळेत बघायला मिळाला. या प्रकरणाची योग्य ती चौकशी करुन या इंग्लीश मिडियम शाळेवर कारवाई करण्याची मागणी पालक वर्गानी केली आहे. स्पर्धेच्या युगात जिल्हा परिषद मराठी शाळेकडे दुर्लक्ष करीत इंग्रजी शिकवणाऱ्यांसाठी खाजगी शाळांमध्ये शिकवण्यासाठी विद्यार्थ्यांचा कल दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मात्र या शाळांचे शुल्क अवाक्याबाहेर गेले आहे. सध्या चालू सत्रामध्ये नोटबंदीच्या निर्णयाने काहींना अडचणीचा सामना करावा लागला. त्यामुळे शाळेचे शुल्क वेळेवर भरता आले नाही आणि हाच मुद्दा समोर करुन संथ थॉमस इंग्लीश मिडीयमच्या व्यवस्थापकांनी विद्यार्थ्यांना सराव परीक्षेपासून वंचित ठेवण्याचा डाव रचला. हा प्रकार आजच नाही तर नियमीत सुरु असते. पालक वर्गानी यावर विचारणा केली तर मुलांना शाळेतून काढण्याची धमकी दिली जाते. त्यामुळे पालकवर्गही त्यांच्या मनाप्रमाणे वागतात. त्यामुळे शाळेच्या व्यवस्थापकाची मनमानी कायम दिसत आहे. त्यामुळे शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करून शाळा व्यवस्थापनावर कारवाई करण्याची मागणी पालकांकडून होत आहे. क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी बसवून होते वाहतूक विद्यार्थ्यांना ने-आण करणाऱ्या स्कूल बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी भरुन वाहतूक केली जाते. त्यात अनेक विद्यार्थी बसायला जागा नसल्याने पाटीवर दप्तर घेऊन उभेच राहतात. काही जणांना एकाच सिटवर तीन-चार विद्यार्थी बसतात. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना याचा त्रासही सहन करावा लागतो. याबाबत संबंधीत शाळेच्या मुख्याध्यापिका यांना विचारणा केली असता, यावर उत्तर देण्याचे टाळले व व्यवस्थापकाशी बोलण्यास सांगितले. मात्र व्यवस्थापकांनीही दूरध्वनी उचलला नाही.