लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील अडीच हजारपेक्षा अधिक घरकुल धारकांचे धनादेश प्रशासकीय दिरंगाईमुळे लाभार्थ्यांपर्यंत पोहचले नाही. त्यामुळे बांधकाम रखडले आहे. रक्कम न मिळाल्याने कंत्राटदारांनी कामे थांबविल्याची खंत लाभार्थ्यांनी व्यक्त केली.शासनाने घरकुल योजनेसाठी रकमेत मोठी वाढ केली. पात्र नागरिकांना या योजनेचा लाभ देण्याची प्रक्रिया पारदर्शी केल्याने मोठा दिलासा मिळाला होता. ग्रामसभेच्या माध्यमातून लाभार्थी निवडण्याची प्रक्रिया योग्य असली तरी बांधकाम सुरू केल्यानंतर धनादेश देताना प्रशासकीय दिरंगाई होते. चंद्रपूर, राजुरा, बल्लारपूर, वरोरा, मूल तालुक्यात शेकडो प्रकरणे प्रलंबित आहेत. घरकुलचे अर्धवट बांधकाम करून लाभार्थी धनादेशची प्रतीक्षा करीत आहेत. दिवाळीच्या सुट्टयामुळे लाभार्थी गप्प होते. मात्र आता शासकीय कार्यालय सुरू झाली आहे. कंत्राटदार व दुकानदारांचा तगादा लक्षात घेउन घरकुल लाभार्थी पंचायत समिती कार्यालयात निवेदन देऊन समस्येकडे लक्ष वेधण्याची तयारी सुरू केल्याची माहिती आहे. अर्धवट बांधकाम झालेल्या घरकुलांची काही ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांकडून पाहणी झालीच नाही.
धनादेश न मिळाल्याने अडीच हजारांवर घरकुलांचे बांधकाम रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 10:29 PM
जिल्ह्यातील अडीच हजारपेक्षा अधिक घरकुल धारकांचे धनादेश प्रशासकीय दिरंगाईमुळे लाभार्थ्यांपर्यंत पोहचले नाही. त्यामुळे बांधकाम रखडले आहे. रक्कम न मिळाल्याने कंत्राटदारांनी कामे थांबविल्याची खंत लाभार्थ्यांनी व्यक्त केली.
ठळक मुद्देलाभार्थी हतबल : कंत्राटदारांनी थांबविली कामे