लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मध्यचांदा वनविभाग अंतर्गत येणाऱ्या धाबा वनपरिक्षेत्रातील लाठी वनक्षेत्राच्या नाल्यात मंगळवारी रात्री एका वाघिणीचा मृतदेह आढळून आला होता. वाघिणीची शिकार तर करण्यात आली नसावी, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र शवविच्छेदनानंतर वाघिणीचा मृत्यू वृध्दावस्थेमुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे.लाठी वनक्षेत्रात वाघाचा मृतदेह असल्याची माहिती वनविभागाला मिळताच धाबाचे वनपरिक्षेत्र अधिकारी दिलीप वडेट्टीवार आपल्या ताफ्यासह रात्रीच घटनास्थळावर दाखल झाले. तिथे गेल्यावर ती वाघीण असल्याचे दिसून आले. दोन ते तीन दिवसांपूर्वीच वाघिणीचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. बुधवारी सकाळी वाघिणीचा मृतदेह चंद्रपूरजवळील चिचपल्ली येथील रेस्क्यू सेंटरमध्ये शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे यांनी शवविच्छेदन केले. दरम्यान, सदर वाघीण वयोवृध्द होती. वाघिणीचा एक दात तुटला होता. दुसरा दात झिजला होता. त्यामुळे ती शिकार करण्यास असमर्थ होती. यामुळेच तिचा मृत्यू झाल्याची माहिती मुख्य वनसंरक्षक एस.व्ही. रामाराव यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
चंद्रपूर जिल्ह्यातील ‘ त्या’ वाघिणीचा मृत्यू वृध्दावस्थेमुळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 2:03 PM
मध्यचांदा वनविभाग अंतर्गत येणाऱ्या धाबा वनपरिक्षेत्रातील लाठी वनक्षेत्राच्या नाल्यात मंगळवारी रात्री एका वाघिणीचा मृतदेह आढळून आला होता.
ठळक मुद्देदात तुटल्यामुळे शिकार करण्यास असमर्थ