शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
3
Virat Kohli Glenn McGrath, IND vs AUS 1st Test: विराट कोहलीवर दबाव कसा आणायचा? 'द ग्रेट' ग्लेन मॅकग्राने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दिला 'कानमंत्र'
4
नाकाबंदीत थरार! नागपुरात कारचालकाने पोलीस अधिकाऱ्याला फरफटत नेले; सेंट्रल एव्हेन्यूवरील घटना
5
हृदयद्रावक! दुसऱ्यांच्या मुलांना वाचवण्यासाठी जीव धोक्यात घातला, पण स्वतःच्या जुळ्या मुली गमावल्या
6
मुसलमान पुरोगामी, त्यांनी उद्धव ठाकरेंची ही जागा वाचवली; अबु आझमींचा भाजपावर हल्लाबोल
7
Mumbaikar Cricketer Jemimah Rodrigues, WBBL 10: मुंबईकर पोरीने ऑस्ट्रेलियामध्ये केला मोठा धमाका! गोलंदाजांची धुलाई करत फिरवला सामना
8
PM मोदींच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; नायजेरियाने केला सर्वोच्च पुरस्काराने सन्मान
9
श्रीदेवीसोबत कसं होतं नातं? माधुरी दीक्षितचा खुलासा; म्हणाली, "आम्ही कधीच एकत्र..."
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
11
"माझा मुलगा ॲनिमलमधील रणबीरसारखा", अल्लू अर्जुनचं लेकाबाबत वक्तव्य, म्हणाला- "जर मी त्याच्या आईबरोबर..."
12
'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 
13
भारताकडून हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, मोजक्या देशांच्या यादीत मिळवलं स्थान
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
15
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
16
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
17
मुंबईमध्ये अपक्षांना थारा नाहीच! ३६ मतदारसंघांतील आकेडवारी काय सांगते?
18
मुंबई : अभिनेत्याच्या पत्नीला आला एक मेसेज; सायबर ठगाने कसा घातला गंडा?
19
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
20
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड

उपजिल्हा रुग्णालयात आक्रोश...आक्रोश आणि आक्रोश !

By admin | Published: September 23, 2016 1:05 AM

सिरसपूर (शिवरा) गावात पऱ्हाटीचे निंदन करून मजूर घेऊन गावाकडे परतणाऱ्या एम.एच.३४ एबी-९०३४ क्रमांकांच्या टाटा एस वाहनाला ट्रॅक्टरची धडक बसली.

शेतमजुरांच्या वाहनाला अपघात : ४३ मजुरांपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनकचिमूर : सिरसपूर (शिवरा) गावात पऱ्हाटीचे निंदन करून मजूर घेऊन गावाकडे परतणाऱ्या एम.एच.३४ एबी-९०३४ क्रमांकांच्या टाटा एस वाहनाला ट्रॅक्टरची धडक बसली. या अपघातात जखमी ४० मजूर जखमी झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली होती. जखमी मजुरांना चिमूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात एकच डॉक्टर असल्याने उपचारास विलंब होत असल्याने अनेक रुग्ण व्हिवळत होते. त्यामुळे नागरिकांनी आरोग्यसेवेविषयी आक्रोश व्यक्त केला. मागील अनेक दिवसांपासून नागभीड तालुक्यातील गोविंदपूर येथील महिला-पुरुष मजूर चिमूर तालुक्यात पऱ्हाटीचे निंदन काढण्याच्या कामावर येत आहेत. बुधवारी सकाळी ७ वाजता शिदोरी घेवून लहान, मोठे व वृद्ध असे मिळून ४३ मजूर मजुरीसाठी सिरसपूर (शिवरा) येथे टाटाएस या चारचाकी वाहनाने आले. वाहनाच्या क्षमतेपेक्षा जास्त मजूर भरलेले होते. दिवसभर शेतावर कामकरून गावाकडे परितीला निघाले असता, सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास मांगलगाव-जांभुळजाट रस्त्यावर समोरुन येणाऱ्या ट्रॅक्टरला जबरदस्त धडक बसली. त्यामुळे मजूर भरुन असलेले वाहन रस्त्याच्या खाली पलटले. यात सर्व मजूर जखमी झाले. समोरासमोर वाहनांची धडक बसून अपघात झाल्याने अनेक जण एकमेकांच्या अंगावर पडले. काही खाली दबले तर काही फेकल्या गेले. या प्रकारामुळे घटनास्थळावर जखमींच्या किंचाळ्या सुरू झाल्या. अपघाताची माहिती जांभुळघाट व मालेवाडा गावाला मिळताच अनेकांनी जखमींना बाहेर काढण्यासाठी मदत केली. जखमींना प्राथमिक आरोग्य केंद्र जांभुळघाट व उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे उपचारासाठी रवाना करण्यात आले. यासाठी शंकपूर, जांभुळघाट, चिमूर व नेरी आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिका घटनास्थळी आल्या. घटनेच्या तपास भिसी पोलीस करीत असून दोन्ही वाहन चालकाविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)एकाच डॉक्टरावर रूग्णांचा भारउपजिल्हा रुग्णालय होवून तीन-चार वर्षाचा कालावधी लोटला. मात्र रुग्णालयात डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. तर अनेक अत्याधुनिक उपकरणाचा व तांत्रिकांची वानवा आहे. बुधवार सायंकाळी अचानक अपघातात ३० ते ४० जण जखमी अवस्थेत रुग्णालय दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात डॉ. बेंडले एकटेच असल्याने त्यांची चांगलीच तारांबळ उडत होती. आधी कुणाला सेवा द्यावी, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहात होता. रुग्णांसाठी खाटांची संख्याही कमी पडत होती. सहा रूग्णांना नागपूर हलविले अपघातात जखमी झालेल्यांमध्ये सुभाष खामदेवे (३५), शिला चंदनखेडे (५०), नागेश्वर नैताम (३०), सुनंदा दहीकर (३५), आकाश सुभाष खामदेवे (१७), शंकर बहु आवारी (३५), मिरा विश्वनाथ भरडे (४५), सुनिता खाडे (३५), मीना यादव बन्सोड (३६), सुमित्रा जयराम दुधपुरे (५०), मंदा गुरुदास कामडी, मोहित तोरपकवार (१७), पंचशिला बन्सोड (४०), माया अरुण सहारे (३८), सिताबाई सामुसाकडे (४०), संगीता गुलाब मडावी (३८), प्रतिभा काशीनाथ मसराम, विजया नानाजी बांबोळकर, रंजना गजानन चन्ने, अश्विनी गुलाब सहारे (१९) यांचा समावेश आहे. यापैकी गंभीर जखमी ६ रुग्णांना नागपूर येथे हलविण्यात आले तर काही चंद्रपूर येथे हलविण्यात आले. उर्वरित रुग्ण चिमूर येथे उपचार घेत आहेत. नागरिकांनी गजबजले उपजिल्हा रुग्णालयघटना माहित होताच अनेकांनी रुग्णालयामध्ये धाव घेतली. त्यामुळे रुग्णालयामध्ये दुचाकी वाहनासह चारचाकी वाहनाची रिघ लागली व नागरिकांनी रुग्णालयात गजबजले. ठाणेदार दिनेश लबडे यांनी उपचारात बाधा येवू नये म्हणून सुरक्षा व्यवस्था लावली. जेवनाची व्यवस्था चिमूर येथील सामाजिक कार्यकर्ते प्रदीप बंडे व आमदार भांगडिया मित्र मंडळ तर्फे विनोद शर्या यांनी करून जखमी व नातेवाईकांना मसाला भाताचे वितरण केले. अचानक घडलेल्या घटनेने रुग्णालयातील मनुष्यबळ कमी पडू लागले. त्यामुळे अनेक समाजसेवी व्यक्तीसह नागरिकांनी जखमींना आपल्या परिने मदत केले.