लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : राज्यातील मुद्रांक विक्रेते व दस्तलेखक यांच्या प्रमुख मागण्यांसाठी उभारलेल्या सोमवारपासून सुरू केलेल्या बेमुदत संपाच्या पहिल्याच दिवशी नागरिकांची बहुतांश कामे खोळंबली. यामुळे आॅनलाईन विक्री न झाल्याने शासनाचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.भद्रावती तहसील कार्यालयासमोर सोमवारी मुद्रांक विक्रेते व दस्तलेखक यांनी बेमुदत संप पुकारून तहसील कार्यालयासमोर ठिय्या मांडला होता. यात कालीदास कोलते, सुदीप बोढे, पुरुषोत्तम राहुलगडे, राजेंद्र पेटकर, सूर्यभान मत्ते, धनपाल राहुलगडे, संतोष रामटेके, ललित कोलते, अमित ठेंगरे, मंदा पेटकर, नामदेव मत्ते, बाळकृष्ण रामटेके आदी मुद्रांक विक्रेते व दस्तलेखक सहभागी झाले होते.
मुद्रांक विक्री व दस्तलेखनाच्या बेमुदत संपाने कामे खोळंबली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2017 11:10 PM