उपविभागीय कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ई पीक पाहणी प्रकल्पाची माहिती देताना शिंदे यांनी या ॲपचा फायदा यावर प्रकाश टाकला. १५ ऑगस्टपासून राज्यभर हा पथदर्शी प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असून याद्वारे पीक पाहणी प्रक्रियेत शेतकऱ्यांचा सहभाग वाढविणे आणि त्यांच्या हितासाठी असलेल्या सरकारी योजनांची अंमलबजावणी चोखपणे करून त्याचा लाभ थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या ॲपमुळे गाव तालुक्यातील कोणत्या पिकाखाली किती क्षेत्र आहे याची निश्चित आकडेवारी सहज उपलब्ध होणार आहे. कृषी विभागाच्या देय असणाऱ्या विविध योजनांचे लाभ खातेदारांना अचूकरित्या देणे यामुळे शक्य होणार आहे. या ॲपमुळे पिकांच्या आधारभूत किमतीवर पीक निहाय लागवडीचे क्षेत्र आणि उत्पन्नाचा अचूक अंदाज मिळणे शक्य होणार असून खातेनिहाय व पीकनिहाय क्षेत्राची यादी उपलब्ध होणार आहे. तसेच पीक विमा योजना आणि पीक नुकसान भरपाई अदा करणे सहज शक्य होणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
090921\img_20210909_100315.jpg
warora