शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
2
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
3
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
4
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
5
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
6
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
7
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
8
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
9
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
10
विदर्भातील 'या' १२ आमदारांना मतदारांनी नाकारले; महायुतीच्या आमदारांनाही दिला झटका 
11
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
12
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
13
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
14
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय
15
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
16
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
17
Video: उच्चशिक्षित इंजिनीअर, प्रेयसीच्या विरहात बनला भिकारी; अवस्था पाहून लोकंही हळहळले
18
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
19
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
20
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."

ई-पॉस मशीन तुटवड्याने खत विक्रेते धास्तावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2017 12:38 AM

रासायनिक खतांच्या साठेबाजीला आळा घालण्यासोबतच विविध खतांचे अनुुदान थेट कंपन्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी...

ठळक मुद्दे५४० मशीनचा पुरवठा : जिल्ह्यातील १०२४ परवानाधारक प्रतीक्षेत

राजेश मडावी ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : रासायनिक खतांच्या साठेबाजीला आळा घालण्यासोबतच विविध खतांचे अनुुदान थेट कंपन्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी१ नोव्हेंबरपासून परवानाधारक विके्रत्यांनी ई-पॉस (पॉर्इंट आॅफ सेल) मशीनद्वारेच शेतकºयांना खतविक्री करावी, असा नियम लागू करण्यात आला़ त्यामुळे जिल्ह्यातील १ हजार २४ पैकी ७५० परवानाधारक विके्रत्यांनी मशीनसाठी नोंदणी केली़ आजमितीस ५४० मशीनचा पुरवठा करण्यात आला़ मात्र उर्वरित विक्रेत्यांना ही मशीन मिळाली नाही़ परिणामी अनुदानित रासायनिक खतांची विक्री कशी करावी, या प्रश्नाने चांगलेच धास्तावले आहेत़केंद्र व राज्य शासनाकडून विविध प्रकारच्या रासायनिक खतांसाठी अनुदान जाहीर करण्यात आले़ यापूर्वी खताची खरेदी केलेल्या शेतकºयांच्या खात्यात अनुदान जमा केले जात होते़ या आॅफ लाईन व्यवहारातून गैरव्यवहार वाढीस लागले़ शिवाय खतांची अवैध साठेबाजी वाढली़ या प्रकाराला आळा घालण्यासाठी शासनाने ई-पॉस मशीनद्वारेच अनुुदानित खतांची विक्री करण्याचे बंधन घातले़काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील परवानाधारक खतविक्रेत्यांना ई-पॉस मशीनसंदर्भात तज्ज्ञांकडून प्रशिक्षण देण्यात आले़ इंटरनेटशी संबंधित असलेली ही मशीन शेतकºयांच्या आधारकॉर्डाशी लिंक करण्यात आली असून शासनाने जाहीर केलेल्या अनुदानाचा लाभ थेट कंपन्यांच्या खात्यात जमा होणार आहे़ मात्र, ज्या परवानाधारक खत विके्रत्यांकडे ई- पॉस मशीन नाही, अशा विके्रत्यांना अनुदानित खते विकण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे़ जिल्ह्याकरिता ५४८ मशीन आले़त्यातील ८ मशीनमध्ये तांत्रिक त्रुटी निघाल्याने संबंधित कंपनीकडे परत करण्यात आले़ सद्य:स्थितीत ५४० मशीन खत विक्रेत्यांकडे कार्यान्वित आहेत़ पण, वीज वितरण कंपणीचा बेरभरवसा, इंटरनेट कनेक्टीव्हिटी आणि सर्व्हर डाऊन आदी कारणांमुळे ग्रामीण भागातील बºयाच ई- पॉस मशीन काम करत नसल्याची नाराजी विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे़जिल्ह्यात १ हजार २४ परवानाधारक खत विक्रेते आहेत़ यातील ७५० विके्रत्यांनी ई-पॉस मशीनसाठी कृषी विभागाकडे नोंदणी केली़ मशीनच्या उपलब्धतेअभावी उर्वरित विक्रेते संकटात सापडले आहेत़ अनुदानित खतांचा साठा करूनही सुरुवातीला कानाडोळा करणाºया काही विक्रेत्यानी दुर्लक्ष केले होते़परंतु, खत विक्रीस प्रतिबंध केल्याने आता स्वत:हून ई- पास मशीनची नोंदणी करण्यास पुढे येत असल्याचे चित्र दिसून येत आहे़ मात्र त्यांना प्रतीक्षा आहे.मशीनअभावी अनुदानित खत विक्रीस प्रतिबंधविविध कंपन्यांच्या खतांना केंद्र सरकारकडून अनुदान देण्याच्या पद्धतीत प्रथमच आमुलाग्र बदल करण्यात आला़ रासायनिक खताच्या अनुदानाची रक्कम शेतकºयाच्या खात्यात जमा करण्याऐवजी ई-पॉस मशीनद्वारे संबंधित कंपनीच्या खात्यात वळते होणार आहे़ त्यासाठी परवानाधारक विक्रेत्यांना स्वत:च्या दुकानात ही मशीन लावणे बंधनकारक केले आहे़२०० मशीनचा प्रस्ताव सादरपरवानाधारक विक्रेत्यांची संख्या लक्षात घेऊन २०० ई-पॉस मशीनची मागणी शासनांकडे केली आहे़ यापैकी १०० मशीन येत्या काही दिवसांत जिल्ह्यास मिळणार आहे़त. त्यामुळे विक्रेत्यांनी घाबरण्याचे काहीच कारण नाही़ तांत्रिक समस्या निर्माण झाल्यास तातडीने संपर्क साधावा़- एस़ एस़ किरवे, जिल्हा कृषी विकास अधिकारीतांत्रिक अडचण दूर करावीई-पॉस मशीनमुळे खतांची खरेदी व विक्रीत पारदर्शकता आली आहे़ इंटनेट कनेक्टीव्हिटी उत्तम राहिल्यास कामे सहजपणे होतात़ ग्रामीण भागात काही ठिकाणी तांत्रिक समस्या आहेत़ त्या तातडीने दूर केल्या पाहिजे़त.- अभिजित खटी, सचिव, चंद्रपूर डिस्ट्रिक्ट अ‍ॅग्रो डीलर्स असोसिएशन