लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ब्रम्हपुरी वन विभागातील उत्तर दक्षिण वन परिक्षेत्रातील गावपरिसरात व शिवारात ई-१ वाघिणीचा अति प्रमाणात वावर असल्याने त्या भागातील जनतेची मागणी असल्याने शुक्रवारी दुपारी नवेगाव उपक्षेत्रातील कोरेगाव नियत क्षेत्रामध्ये कक्ष क्र.१५७ मध्ये जेरबंद करण्यात आली आहे.ब्रम्हपुरी तालुक्यातील नवेगाव येथे एका वाघिणीचा मोठा वावर असल्याने दहशत निर्माण झाली होती. तिला पकडण्यात यावे, अशी जनतेची मागणी असल्याने ब्रम्हपुरी वनविभागाने मुख्य वनजीवरक्षक तथा मुख्य प्रधान वनरक्षक (वन्यजीव) महाराष्ट्र राज्य नागपूर यांच्याकडे ई-१ वाघिणीला पकडण्यासाठी परवानगी मागितली होती. गुरुवारी तसे आदेश प्राप्त झाल्याने शुक्रवारी उत्तर वनपरिक्षेत्रातर्गत नवेगाव उपक्षेत्रातील गोरेगाव नियत क्षेत्रामध्ये (कक्ष क्रमांक १५७) मध्ये दुपारी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे यांनी ई-१ वाघिणीला बेशुद्ध करून जेरबंद केले आहे. जेरबंद करण्यात आलेल्या ई-१ वाघिणीचे अंदाजे वय दोन वर्ष असून तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आल्यानंतर गोरेवाडा प्राणिसंग्रहालय व बचाव केंद्र नागपूर येथे हलविण्यात आले आहे. सदर कार्यवाही दक्षिण वनपरिक्षेत्राअधिकारी जी. आर. नायगमकर, उत्तर वनपरिक्षेत्राधिकारी पुनम ब्राम्हणे, नवेगाव वनपरिक्षेत्रातील सर्व वनाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
नागरिकांना दहशतीत ठेवणारी ई-१ वाघीण अखेर जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2019 10:48 AM
ब्रम्हपुरी वन विभागातील उत्तर दक्षिण वन परिक्षेत्रातील गावपरिसरात व शिवारात ई-१ वाघिणीचा अति प्रमाणात वावर असल्याने शुक्रवारी दुपारी नवेगाव उपक्षेत्रातील कोरेगाव नियत क्षेत्रामध्ये कक्ष क्र.१५७ मध्ये जेरबंद करण्यात आली आहे.
ठळक मुद्देब्रह्मपुरी वनविभागाची कार्यवाही गोरेवाडा प्राणिसंग्रहालयात नेणार