चंद्रपूर : राजस्थान येथील कोटा येथे शिक्षण घेत असलेल्या महाराष्ट्रातील सुमारे १८०० विद्यार्थ्यांचा स्वगृही परतण्याचा मार्ग राजस्थान सरकारच्या परवानगीमुळे मोकळा झाला आहे, अशी माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. यामध्ये विदर्भातील काही व चंद्रपूर जिल्ह्यातील ३६ विद्यार्थी असल्याचेही त्यांनी सांगितले.दिल्ली येथे महाराष्ट्रातील सुमारे १२०० कामगार अडकलेले आहेत. शिवाय तेलंगणातही अनेक कामगार कामानिमित्त गेले आणि ते अडकून पडले आहेत. त्यांना स्वगृही परत येता येत नसल्यामुळे त्यांचे कुटुंबीय चिंतेत आहेत. परराज्यात लॉकडाउनमुळे अडकलेल्या कामगारांना आपल्या गृहराज्यात आणण्यासाठी केंद्र सरकारच्या मंजुरीची गरज असते. तेलंगणा सरकारसोबतही वारंवार चर्चा व पत्रव्यवहार सुरू असल्याची माहिती वडेट्टीवार यांनी दिली.
‘त्या’ विद्यार्थ्यांचा परतण्याचा मार्ग सुकर - वडेट्टीवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 3:06 AM