दिवसेंदिवस शालेय विद्यार्थी व्यसनाच्या आहारी जाताना दिसत आहे. यातून बालगुन्हेगारीचे प्रमाण लक्षणीय वाढत आहे. मात्र विद्यार्थ्यांनी मकरसंक्रांतीनिमित्त व्यसनापासून दूर जाण्याचा प्रयत्न करुन गोड बोलण्याचा संकल्प करावा. त्यातून आपले आयुष्य सुंदर होण्यास निश्चितच मदत होईल. मकरसंक्रात हा सण आपल्या मनातील राग, मत्सर, द्वेश टाळून आपल्या नातेसंबंधात गोडवा निर्माण करण्याचा आहे. राग हा क्षणिक असतो. मात्र त्यामुळे नातेसंबंध दुरावत असतात. याशिवाय समाजातील नकारात्मक भावना वाढीस लागते. बहुतेकदा गुन्हे घडण्याचे कारणसुद्धा राग अनावर होणे हेच असते. त्यामुळे गोड बोलून नातेसंबंध टिकवा, असे विचार पडोली पोलीस स्टेशनच्या ठाणेदार वैशाली ढाले यांनी मकरसंक्रातीच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. मकरसंक्रातीला महिला हळदीकुंकूवाचे कार्यक्रम करीत असतात. महिलांनी स्वत:ला दुबळे समजू नये, स्वत:च्या रक्षणाची जबाबदारी स्वत: पेलण्यासाठी स्वत:च पुढाकार घ्यावा. कुटुंबातील महत्वाचा दुवा स्त्री असते. त्यामुळे स्त्रीयांनीच धैर्याने व खंबीरपणे प्रत्येक संकटाला सामोरे गेले पाहिजे, यातून कुटुंबाचे व पर्यायाने समाजाचेही हित आहे. यात महिला नक्कीच यशस्वी होतील, असा विश्वास ठाणेदार ढाले यांनी व्यक्त केला.मानव हा समाजात २ाहणारा प्राणी आहे. संवाद ही मानवाची गरज आहे. त्यासाठीच मानवाने गोड बोलून जग जिकंण्याचा प्रयत्न करावा. यातून माणसेही आपणाशी जोडली जातात. त्यामुळे मनुष्यांनी आनंददायी जीवनासाठी गोड आणि गुड बोलण्याचा निर्धार करावा, असेही वैशाली ढाले म्हणाल्या.
तीळगुड खा आणि गोड बोला, जग जिंका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 11:04 PM
दिवसेंदिवस शालेय विद्यार्थी व्यसनाच्या आहारी जाताना दिसत आहे. यातून बालगुन्हेगारीचे प्रमाण लक्षणीय वाढत आहे. मात्र विद्यार्थ्यांनी मकरसंक्रांतीनिमित्त व्यसनापासून दूर जाण्याचा प्रयत्न करुन गोड बोलण्याचा संकल्प करावा. त्यातून आपले आयुष्य सुंदर होण्यास निश्चितच मदत होईल. मकरसंक्रात हा सण आपल्या मनातील राग, मत्सर, द्वेश टाळून आपल्या नातेसंबंधात गोडवा निर्माण करण्याचा आहे.
ठळक मुद्देमकरसंक्रांतीनिमित्त ठाणेदार ढाले यांचा संदेश